ट्रम्प यांचा कट्टर समर्थक असलेल्या नेत्याचे असेही स्कॅंडल : पती, पत्नी आणि तो.... - christian leader in a scandal who supports donald trump in 2016 | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रम्प यांचा कट्टर समर्थक असलेल्या नेत्याचे असेही स्कॅंडल : पती, पत्नी आणि तो....

रॉयटर्स
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

एका 29 वर्षीय तरुणाच्या दाव्याने खळबळ 

न्यू याॅर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील निवडणुकीतील अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यांना 2016 च्या निवडणुकीत ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळण्यासाठी महत्त्वाचे ठरलेले जेरी फाॅलवेल (ज्यु.) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

परंपरावादी ख्रिश्चन समाजात जेरी हे प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एका बिझनेस पार्टनरने खळबळजनक दावा केला असून  जेरी यांच्या पत्नी बेकी यांच्यासोबत एका तरुण बिझनेस पार्टनरचे शारीरिक संबंध होते. एवढेच नाही तर जेरी यांच्याच पुढाकाराने हे संबंध प्रस्थापित झाले होते. बेकी आणि त्यांचा बिझनेस पार्टनर असलेला तरुण जिनकार्लो ग्रॅन्डा यांच्यातील शारीरिक संबंध याचा आनंद जेरीपण लुटत होते, असे या दाव्यात नमूद करण्यात आले आहे.

राॅयटर या वृत्तसंस्थेकडे जिनकार्लो ग्रन्डा याने हा दावा केला आहे. त्यासाठी काही चॅट, टेप यांचा पुरावा देण्यात आला आहे. फाॅलवेल हे तेथील लिबर्टी युनिर्व्हसिटीचे प्रमुख आहेत. कोरोना हे थोतांड असल्याचे सांगत चीन आणि उत्तर कोरिया यांचे हे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला होता. लाॅकडाऊन झुगारून मार्च महिन्यातच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यापीठ सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तेथील प्रशासनाने तो हाणून पाडला.

अमेरिकन उच्चभ्रू वर्तुळात फाॅलवेल यांची ऊठबस असते. मात्र ग्रन्डाच्या दाव्यानंतर त्यांना युनिर्व्हसिटीचे प्रमुखपद सोडावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. ग्रन्डाच्या दाव्यानुसार तो 2012 मध्ये वीस वर्षांचा असताना पूल अटेंडंट म्हणून फाॅलवेल यांच्याकडे काम करत होता. तेथेच त्याला फाॅलवेल दांपत्याने हेरले. सात वर्षे या तिघांमधील संबंध सुरू होते. 2019 पर्यंत अनेकदा एकत्र आल्याचे सांगितले.  तो आणि फाॅलवेल यांच्या पत्नी बेकी यांच्यातील संबंध हे जेरी हे त्याच रुममधून किंवा व्हिडीओमधून पाहायचे, असेही त्याने सांगितले. या दोघांनी ग्रन्डाला मियामी येथे होस्टेल सुरू करण्यासाठी आर्थिक मदतही केली होती. व्यावसायिक संबंधात बिघाड आल्यानंतर आपण त्यांची साथ सोडल्याने ग्रन्डा याने स्पष्ट केले. जेरी हे या आधीपण एका वादग्रस्त फोटोमुळे चर्चेत आले होते. त्यांनी पॅंटची झिप अर्धवट उघडलेल्या अवस्थेत एका मैत्रिणीसोबतच फोटो इनस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्या मैत्रीणीची अवस्था जवळपास तशी होती. त्या फोटोवरून त्यांना विद्यापीठीच्या प्रमुख पदावरून हटविण्याची मागणी झाली होती. तो फोटो जेरी यांनी नंतर डिलीट केला होता.

ग्रॅन्डा याने केलेल्या दाव्यानंतर राॅयटरने याबाबत जेरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रन्डाचे आपल्या पत्नीशी संबंध असल्याचे मान्य केले. मात्र ते जगासमोर आणू, अशी धमकी देऊन आमच्याकडून पैसे लाटण्याचा त्याचा प्रयत्न होता, असा आरोप केल आहे. ट्रम्प यांच्या प्रत्येक कृतीला समर्थन देणारे जेरी या अडचणीत आल्याने ट्रम्प समर्थकांनाही धक्का बसला आहे.  

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख