चिराग पासवानांचे पत्र व्हायरल..नितीशकुमार जवळीक साधण्याचे ढोंग करीत आहेत.. - Chirag Paswan letter goes viral. Attack on Chief Minister Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

चिराग पासवानांचे पत्र व्हायरल..नितीशकुमार जवळीक साधण्याचे ढोंग करीत आहेत..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

"माझे वडील आजारी असताना नितीशकुमार त्यांना पाहायला देखील आले नाही, आता आमच्याशी जवळीस साधण्याचे ढोंग करीत आहेत," असे चिराग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.  

पाटना : बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्यातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज एक पत्र प्रसिद्ध करून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "माझे वडील आजारी असताना नितीशकुमार त्यांना पाहायला देखील आले नाही, आता आमच्याशी जवळीस साधण्याचे ढोंग करीत आहेत," असे चिराग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.  

चिराग पासवान यांच्या कार्यालयाकडून हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रात पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चिराग आपल्या पत्रात म्हणतात की माझ्या वडीलांच्या अखेऱ दिवसांबाबत नितीशकुमार अचानक दुःखी झाले आहेत. पण वडील आजारी होते, तेव्हा नितीशकुमार यांनी त्यांना कधीही भेटण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या तब्बेतची विचारपूस करण्यासाठी कधीही फोन केला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या वडीलांच्या शेवटच्या दिवसात त्याच्या उपचाराबाबत दिवस-रात्र प्रयत्न केले. नितीशकुमार सध्या मोदींच्या बरोबर असताना त्यांना कधी विचारले नाही की माझ्या वडीलांच्या शेवटच्या दिवसात त्यांना कोणी भेटत नाही.  
 
चिराग पासवान यांनी त्यांचे वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर काही वेळाने लोकजनशक्ती पार्टीच्या व्हिजन डॉक्यूमेंट व्हिडिओवर लिक केल्याप्रकरणी आपले मत मांडले आहे. चिराग म्हणाले , ''नितीशकुमार, तुम्ही माझ्या ' बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट' वर टीका करू शकले असते, पण त्यांना याऐवजी व्हिडिओ लिककरून हे दाखविण्याचा प्रयत्न केला की वडीलांच्या मृत्यूनंतर कसे शुटिंगमध्ये व्यग्र होते. चिराग यांनी स्पष्ट केलं आहे की पहिल्या टप्यातील निवडणुकीत उमेदवारांचे नाव जाहीर होत असतानांच माझ्या वडीलांचे निधन झाले. त्यावेळी प्रचार सुरू झाला होता. पण वडीलांच्या निधनामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना मध्येच सोडून देता येत नव्हते म्हणून मला वडीलांच्या निधनानंतर काही तासांतच पक्षाच्या कामासाठी परतावे लागले. 
 
चिराग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की माझ्यावर टीका करीत असताना नितीशकुमार सध्या अधिक कमजोर झालेले दिसतात. राज्याच्या विकासाचा रोडमॅप त्यांनी मतदारांसमोर मांडायला हवा. गेल्या पाच वर्षात आपण राज्याचा काय विकास केला, याचा हिशेब त्यांनी जनतेसमोर मांडायला पाहिजे. पण जदयू नेता आणि कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करून त्यांच्या कुंटुबियांना त्रस्त करीत आहेत. पण बिहारच्या जनतेला त्याचा हा राजकीय डाव समजत आहेत. 

मुंगेर येथे त्याप्रमाणे भाविकांवर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. नितीशकुमार यांनी निवडणुकीच्या मुद्दांवर निवडणूक लढविली पाहिजे, आपण कुठल्याही व्यासपीठावर त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख