नितीशकुमार यांच्यासाठी कारागृहचं योग्य : चिराग पासवान  - Chirag Paswan accused Chief Minister Nitish Kumar of corruption | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार यांच्यासाठी कारागृहचं योग्य : चिराग पासवान 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भष्ट्राचारांचा आरोप केला आहे. त्यांची जागा कारागृहात असल्याची टीका पासवान यांनी केली आहे. 

पाटणा : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणुकीला काही दिवसच बाकी आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सतत टीका करीत आहेत. चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भष्ट्राचारांचा आरोप केला आहे. त्यांची जागा कारागृहात असल्याची टीका पासवान यांनी केली आहे. 

चिराग पासवान म्हणाले की नितीश कुमार यांच्या कार्यकाळात भष्ट्राचार झाला आहे. या भष्ट्राचाराची नितीश कुमार यांनी कल्पना होती. तेही या भष्ट्राचारात सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ते दोषी आढळले तर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येईल. त्याच्यासाठी कारागृहाची जागाच योग्य आहे. त्याच्या कार्यकाळात झालेल्या भष्ट्राचाराची चैाकशी झाली पाहिजे. यात दोषी आढळलेल्यांची रवानगी काराग़ृहात केली पाहिजे. भष्ट्र नेत्यांना असे मुक्तपणे फिरण्याची परवानगी देऊ नये. त्यांना कारागृहाचा रस्ता दाखवावा.   

ज्या ठिकाणी लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) उमेदवार नाहीत तेथे भाजपच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन लोजपचे नेते चिराग पासवान यांनी केले आहे. मतदानाला अगदी दोन दिवस बाकी राहिले असतानाच पासवान हे मुख्यमंत्री नितीशकुमारांवर जोरदार हल्ला चढवित आहे. पासवान यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये जेडीयूला म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमारांना लक्ष्य केले आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा दिसत असून नितीशकुमारांचा चेहराही गायब झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काल बिहारमधील सर्वच वर्तमानपत्रात भाजपने जाहीरात दिली आहे. या जाहीरातीत नितीशकुमारांचा चेहरा नाही. केवळ केवळ म्हणजे मोदी आणि भाजपलाच दाखविले आहे. या जाहीरातीवरूनही पासवान यांनी नितीशकुमारांवरांवर टीका केली. 

पासवान म्हणाले, की नीतीश आणि नीतशमुक्त सरकार असे अभियान आपल्या पक्षातर्फे राबविले जात आहे त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.सर्वांना मी आवाहन करतो, की लोजपचे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना निवडूण द्या आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत तेथे भाजपचा प्रचार करा आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान करा. 

पासवान यांच्या जेथे जेथे सभा झाल्या आहेत तेथे त्यांनी नितीशकुमार यांचे सरकार उखडून फेकून द्या. कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देऊ नका असे सांगत हल्लाबोल करीत आहेत. राज्यात जेथे जेथे जेडीयूचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी पासवान यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

याचाच अर्थ असा आहे की भाजपचे उमेदवार अधिक कसे निवडून येतील याची काळजी ते घेत आहेत. तर जेडीयूचा पाडाव कसा होईल याची व्यूहरचना ते आखत आहेत. पासवान यांच्या पक्ष खरेच जेडीयूला धूळ चारेल का याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपला अधिक जागा मिळाल्या आणि जेडीयू कमी मिळाल्या तरी नितीशकुमारचं मुख्यमंत्री होती असे भाजपचे झाडूनपुसून नेते सांगत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख