पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

ऑक्सिजनची पातळी एकदम कमी झाल्यानेसुंदरलाल बहुगुणायांचे निधन झाले
Sarkarnama Banner - 2021-05-21T171401.752.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-21T171401.752.jpg

डेहराडून  : ज्येष्ठ पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा (वय ९४) यांचे आज निधन झाले. काही दिवसापूर्वी त्याच्या कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ता. ८ मे रोजी ऋषिकेश येथील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.  chipko movement leader sundarlal bahuguna died at aiims rishikesh

काल रात्रीपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.  ऑक्सिजनची पातळी एकदम कमी झाल्याने त्यांचे निधन झाले, असे ऋषिकेश येथील ‘एम्स’ रुग्णालयातचे संचालत रविकांत यांनी सांगितले. हिमालयातील वनांच्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा दिला. त्यांनी १९७३ मध्ये उत्तराखंडमध्ये चिपको आंदोलनाला सुरुवात केली होती.  चिपको आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. हे आंदोलन संपूर्ण देशभर गाजले.पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या कामामुळे बहुगुणा यांना १९८६ मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आणि २००९ मध्ये देशातील मानाचा पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी टि्वट करीत म्हटलं आहे की, सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या परंपरेचा पुरस्कार त्यांनी केला होता. त्यांचा साधोपणा व दयाळू भाव कधीही विसरता येणार नाही.

‘‘चिपको आंदोलन बहुगुणा यांच्यामुळेच तळागाळापर्यंत पोचले. पाणी, जंगल आणि जमीन यांना प्राधान्य देणारे आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांचा लढा कायम स्मरणात राहील. बहुगुणा यांच्या निधनाने  संपूर्ण जगाची मोठे नुकसान झाले आहे,’’ असं टि्वट तीरथ सिंह यांनी केलं आहे. 
 
ता. ९ जानेवारी १९२७ रोजी भागीरथी नदीच्या किनाऱ्यावरील मरोडा गावात (जि. टिहरी)  सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म  झाला होता.  सुंदरलाल बहुगुणा यांनी हुतात्मा श्रीदेव सुमन यांच्याकडून प्रेरणा घेत लहानपणीच स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्‍यांनी टिहरी संस्थानाविरोधातही आंदोलन केले होते. टिहरी धरणाच्या विरोधातील चळवळीतही बहुगुणा सक्रिय होते.
 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com