मुख्यमंत्री येडियुरप्पा खलनायक : सहकार मंत्र्यांची जीभ घसरली  - Chief Minister Yeddyurappa is a villain : The tongue of the co-operation minister slipped | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री येडियुरप्पा खलनायक : सहकार मंत्र्यांची जीभ घसरली 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

दोघांपैकी कोणीही खलनायक नाही.

बंगळूर : कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री एस. टी. सोमशेकर यांनी मंगळवारी (ता. 27 ऑक्‍टोबर) पत्रकारांना संबोधित करताना अचानकपणे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा उल्लेख चुकून "खलनायक' म्हणून केला. तथापि, त्यांनी आपली जीभ घसरल्याबद्दल त्वरीत माफीही मागितली. 

राज्याचे सहकार मंत्री एस. टी. सोमशेकर मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविषयी वरील वक्तव्य केले. त्यानंतर त्यावर त्यांनी माफीही मागितली. 

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हेच "खलनायक' आहेत. त्यावर सिद्धारामय्या म्हणतात की "ते खलनायक नाहीत, तर नायक (हिरो) आहेत. मग सिद्धारमय्या नायक की खलनायक? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री सोमशेकर यांना विचारला होता. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची जीभ घसरली. त्या वेळी सोमशेखर यांनी उत्तर दिले, की "दोघांपैकी कोणीही खलनायक नाही, येडियुरप्पा खलनायक आहेत.' 

आपली चूक झाल्याचे लक्षात येताच सोमशेकर यांनी त्वरित माफी मागितली. ते म्हणाले की, "जे सरकारला अडचणी आणतात, तेच "खलनायक' आहेत आणि "मुख्यमंत्री येडियुरप्पा हे नायक आहेत' असे मला म्हणायचे होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख