सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज बंगालची वारी करीत होते...ममतादीदींचा आरोप.. - Chief Minister Mamata Banerjee criticizes Narendra Modi, Election Commission | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज बंगालची वारी करीत होते...ममतादीदींचा आरोप..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 मे 2021

ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर  टीकास्त्र सोडलं

कोलकता : पश्चिम बंगाल  West Bengal, Election विधानसभेच्या अध्यक्षपदी बिमन बंदोपाध्याय Biman Bandopadhyay यांची आज सलग तिसऱ्यांदा निवड झाला. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjeeयांनी मोदी सरकारवर कडाडून टीकास्त्र सोडलं. निवडणूक आयोगावरही ममता बॅनर्जींनी टीका केली. Chief Minister Mamata Banerjee criticizes Narendra Modi, Election Commission

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणुकीत भाजपने पाण्‍यासारखा पैसा ओतला अन् राज्यात कोरोनाचा फैलाव झाला. भाजप ‘डबल इंजिन’ सरकारची भाषा करीत होता, पण तृणमूल काँग्रेसने मतांचे द्विशतक गाठले. 

Maratha Reservation:राज्य सरकार नवा मागासवर्ग आयोग स्थापन करणार.. 

निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला असून विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी मतदानात गैरप्रकार करण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगात सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  केली.  नंदीग्रामचा उल्लेख न करता मतदारांचा कौल मान्य असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून काही काम केले नाही. पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने केंद्रीय मंत्री रोज बंगालची वारी करीत होते, असे त्या म्हणाल्या.  
 

बंगालमध्ये निकालानंतर झालेल्या हिंसाचाराचे जे व्हिडिओ भाजपने प्रसारित केले, त्यातील ९० टक्के व्हिडिओ बनावट असल्याचा दावाही बॅनर्जीं यांनी केला. विधानसभेत गेल्या ४६ वर्षांत प्रथमच एखाद्या पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.  

सर्वांच्या लसीकरणासाठी ३० हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असून केंद्रासाठी हा निधी फार नाही. संपूर्ण देशात लसीकरणाचे समान धोरण आखावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  देशात सर्वांना मोफत लसीकरण आणि सर्व राज्यांनी ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख