Toolkit प्रकरणी छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांची होणार चैाकशी...

रमन सिंह यांनी आपल्याटि्वटर हॅडलबाबत माहिती द्यावी..
Copy of Sarkarnama Banner (1).jpg
Copy of Sarkarnama Banner (1).jpg

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये टुलकिट प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांना पोलिसांना नोटिस बजावली आहे. त्यांना येत्या २४ तारखेला त्यांना घरी उपस्थित राहण्याची नोटिस रायपूर पोलिसांनी बजावली आहे. chhattisgarh raipur police issues notice to raman singh in alleged toolkit case

माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांची चैाकशी करण्यासाठी त्यांना ही नोटिस बजावली असल्याचे रायपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमन सिंह यांनी  टि्वटर हॅडलबाबत माहिती द्यावी, तसेच ते कोण चालविते याचीही माहिती द्यावी. त्यांना एआईसीसी रिसर्च प्रोजेक्ट’’ आणि ‘‘कॉरनरिंग नरेंद्र मोदी एंड बीजेपी ऑन कोविड मैनेजमेंट ’’ याचे दस्ताऐवज कुठून मिळाले, ‘कांग्रेस टूल किट एक्सपोज्ड’ हैशटैग चा वापर करणारे कोण आहेत,  यांचा तपास करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. 

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काही दिवसापूर्वी कॅाग्रेसच्या टुलकिट प्रकरणी टीका केली होती. त्यानंतर एनएसयुआय़चे अध्यक्ष आकाश शर्मा यांनी रमन सिंह आणि संबित पात्रा यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ही कारवाई होत आहे. रायपुरचे पोलिस ता. २४ रोजी दुपारी साडेबारा वाजता रमन सिंह यांची चैाकशी करणार आहेत. 

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टि्वट Twitter करुन कॅाग्रेसवर टुलकिटचा Toolkit आरोप केला होता. यावरुन भाजप-कॅाग्रेसमध्ये चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले. संबित पात्रा यांचे टि्वट बनावट असल्याचे टि्वटरनं म्हटलं आहे. या टि्वटमध्ये संबित पात्रा यांनी हेरफार केल्याचा संशय टि्वटरने व्यक्त केला आहे. 

ता. १८ मे रोजी संबित पात्रा यांनी हे टि्वट केलं होते. त्यासोबत काही डॅाक्यूमेंटही त्यांनी शेअर केले होते. त्यावर कॅाग्रेस पक्षाचा लोगो होता. संबित पात्रा यांच्या टि्वटवर टि्वटरने संशय घेतला आहे.  अशा टि्वटमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, म्हणून टि्वटरने या टि्वटला मैनिपुलेटेड मीडिया manipulated media असे म्हटलं आहे.

सोशल मीडियाच्या धोरणानुसार एखाद्या टि्वटचा स्त्रोत खात्रीलायक नसल्यास त्यांच्यावर असं लेबल लावण्यात येते. असं लेबल  व्हिडिओ, टि्वट, फोटो आणि कुठल्याही प्रकारच्या कंटेंटवर लावण्यात येते. अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा अनेक टि्वटवर अशा प्रकारचे लेबल लावण्यात आले होते. त्यानंतर डोनाल्ट ट्रम्प यांचे अंकाऊट बंद करण्यात आले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत.  जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे.  आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे संबित पात्रा यांनी  म्हटलं होते. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com