पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
CBSE Board Class XII examinations cancelled
CBSE Board Class XII examinations cancelled

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठक हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. (CBSE Board Class XII examinations cancelled) 

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी देशातील अनेक राज्यांमध्ये ही स्थिती वेगवेगळी आहे. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोना लाट ओसरलेली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारमन, पियूष गोयल, राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांबाबत आज निर्णय होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण पंतप्रधान मोदी यांनी आज बैठक घेत बारावी परीक्षांबाबत मागील काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम दूर केला आहे. 

पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परीक्षेचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचे या बैठकीकडे लक्ष लागले होते. बारावी परीक्षांबाबत मागील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यामध्ये पोखरियाल यांच्यासह सर्व राज्यांतील शिक्षण मंत्री सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पोखरियाल यांनी परीक्षा रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. परीक्षेचे स्वरूप आणि इतर माहिती एक जून रोजी जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, सीबीएसई बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सर्वच राज्यांतील शिक्षण मंत्री तसेच शिक्षण मंडळांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आल्याचे समजते. केवळ काही महत्वाच्या विषयांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षा केंद्रांच्या संख्येतही जवळपास दुपटीने वाढ केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले विद्यार्थी, परीक्षा केंद्रांवर नियुक्ती देण्यात येणारे शिक्षक व इतर कमचाऱ्यांना लस दिली जाईल. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे परीक्षा केंद्रांवर सक्तीने पालन केले जाईल, असे सांगितले जात होते. पण आज पंतप्रधान मोदींनी परीक्षाच रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com