CBSE दहावीचा निकाल लांबणीवर; जुलै महिना उजाडणार

देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे.
CBSE 10th Result CBSE has extended the deadline to tabulate marks
CBSE 10th Result CBSE has extended the deadline to tabulate marks

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांनी घेतलेल्या परीक्षा व अंतर्गत मुल्यमापनावर गुण दिले जाणार आहेत. हे गुण मंडळाच्या पोर्टलवर जमा करण्यासाठी संलग्न शाळांना सांगण्यात आले होते. पण आता गुण अपलोड करण्याची मुदत वाढविण्यात आल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडला आहे. (CBSE 10th Result CBSE has extended the deadline to tabulate marks)

मंडळाकडून सुरूवातीला ११ जूनपर्यंत गुण अपलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर २० जूनपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असेही स्पष्ट केलं होतं. पण देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गामुळे लॅाकडाऊन असून अनेक निर्बंध आहेत. यापार्श्वभूमीवर मंडळाने गुण अपलोड करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व शाळांना कळविण्यात आले आहे. 

शाळांनी 30 जूनपर्यंत केल्यानंतर त्यानंतर काही दिवसांनी मंडळाकडून निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे गुण अपलोड करण्यास पुन्हा मुदतवाढ न दिल्यास दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी व पालकांना निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाच्या तारखेबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची धाकधूकही वाढली आहे. दहावीच्या निकालावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया अवलंबून आहे. निकाल लांबणीवर पडल्यास अकरावीचे प्रवेशही लांबणार आहेत. 

बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रमाणे इयत्ता बारावीची परीक्षाही रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. CBSE सह बहुतेक राज्यातील मंडळांनी बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. पण देशातील अनेक राज्यांवर अजूनही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहेत. महाराष्ट्रातही ही मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा रद्द केल्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com