breaking news : मायावती यांची मोठी घोषणा..

येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची महत्वाची घोषणा मायावती यांनी आज केली आहे.
Mayawati15.jpg
Mayawati15.jpg

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज मोठी घोषणा केली आहे. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची महत्वाची घोषणा मायावती यांनी आज केली आहे.

येथील सर्व जागा लढविणार असल्याचे मायावती यांनी आज सांगितले. मायावती यांचा आज वाढदिवस आहे.उत्तरप्रदेशात जर आमची सत्ता आली तर सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  देशात कोरोना लसीकरण सुरू होत असल्याने त्यांनी या लसीकरण कार्यक्रमांचे स्वागत केलं आहे.

कोरोना लस मोफत देण्याच यावी, असा आग्रह त्यांनी केंद्र सरकारकडे केला आहे.  'एएनआय' ला मायावती यांनी ही माहिती दिली. मायावतीच्या या घोषणेमुळे राजकीय गणित बदलतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.    


हेही वाचा : माझ हे वाक्य अधोरेखित करुन ठेवा : राहुल गांधी 
 
तामिळनाडू : नव्या कृषी कायद्यांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, आम्ही कृषी कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, हे काळे कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं ठाम मत राहुल गांधी यांनी तामिळनायडूमध्ये पत्रकार परिषदेत वक्त केल.

राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले.   

शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणी आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांना नाखूष ठेवून काही निर्णय घेणार असाल तर त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. तुम्ही इतिहास पडताळूण पाहा. जेव्हा केव्हा भारतीय शेतकरी कमकुवत झाला आहे. तेव्हा संपूर्ण देश कमकुवत झाल्याचं आपण पाहिलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com