आमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील! - BSP Chief Mayawati slams Samajwadi party over joining of nine MLAs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

लखनऊ : बहूजन समाज पक्षाच्या (BSP) निलंबित नऊ आमदारांनी नुकतीच समाजवादी (SP) पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली होती. हे आमदार सपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अखिलेश यांनीही त्याचे संकेत दिले असले तरी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अखिलेश यांच्यावर पलटवार केला आहे. हे आमदार सपामध्ये दाखल झाल्यास पक्षात फूट पडेल, असे भाकित त्यांनी वतर्वलं आहे. (BSP Chief Mayawati slams Samajwadi party over joining of nine MLAs)

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांना पक्षात घेत भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. आता समाजवादी पक्ष बहूजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : पाकिस्तानच्या संसदेत धुमश्चक्री; खासदारांना मारहाण अन् शिवीगाळ

बसपच्या 19 पैकी 9 आमदारांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामध्ये असलम राईनी, असलम अली चौधरी, मुजतबा सिद्दीकी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांचा समावेश आहे. याला प्रत्यूत्तर देत मायावती यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मायावती यांनी याबाबत ट्विट केले असून त्या म्हणाल्या,  घृणास्पद, द्वेष आणि जातीयवाद यामध्ये समाजवादी पक्ष माहिर आहे. बसपचे काही आमदार सपामध्ये जाणार हा प्रचार म्हणजे खोटेपणा आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सपा आणि एका उद्योगपतीशी हातमिळवणी करून पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सपा जर या निलंबित आमदारांप्रती प्रामाणिक असता तर त्यांना आतापर्यंत अधांतरी ठेवलं नसतं.

बसपचे हे आमदार घेतल्यास सपामध्ये बंड होईल, पक्षात फूट पडेल. बसपमध्ये येण्यास आतूर असलेले आमदार बंड करतील. याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळंच त्यांना लटकवत ठेवलं आहे. सपाचा चेहरा आणि चरित्र नेहमीच दलित विरोधी आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात त्यांची तयारी नाही. त्यामुळंच बसप सरकारने सुरू केलेल्या कामांना सपा सरकारने बंद केलं. भदोईला नवीन संत रविदास नगर जिल्हा बनविण्याचा निर्णयही बदलण्यात आला. हे अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका मायावती यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख