पाकिस्तानात पाच हिंदूंची निर्दयी हत्या  - Brutal killing of five Hindus in Pakistan  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पाकिस्तानात पाच हिंदूंची निर्दयी हत्या 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 मार्च 2021

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात हिंदू कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आले आहेत.

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात हिंदू कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. धारदार शस्त्रांनी गळा चिरून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करण्यात आली. मुलतानच्या रहीम यार खान शहरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या अबू धाबी कॉलनीत ही घटना घडली आहे. टेलर काम करणारे 36 वर्षीय राम चंद मेघवाल, त्यांची पत्नी आणि मुले यांचे मृतदेह शनिवारी (ता. ६ मार्च) सकाळी त्यांच्या घरात सापडले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील लग्नकार्य बंद, शनिवार, रविवार संपुर्ण लॅाकडाऊन

 

अज्ञात हल्लेखोरांनी एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, पाच जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. पाचही जणांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू आणि कुऱ्हाड हस्तगत केली. 

रहीम यार खान येथील सामाजिक कार्यकर्ता बीरबल दास म्हणाले की, रामचंद मेघवाल हे हिंदू होते.  ''मेघवाल हे ३६ वर्षांचे होते. बऱ्याच वर्षांपासून ते टेलरिंगचे काम करत होते. ते शांतताप्रिय व्यक्ती होते. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.'' 

आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात फसवणुकीच्या ४५ तक्रारी 
 

या घटनेमुळे शहरात राहणार्या हिंदू-शीखांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे या घटनेनंतर पाकिस्तानी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी दोषींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख