56 वर्षीय पंतप्रधानांचा धक्का; 33 वर्षीय गर्लफ्रेंडशी केलं गुपचूप लग्न

पंतप्रधानांचं खासगीआयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे.
British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds
British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॅानसन यांनी देशवासियांना धक्का दिला आहे. आपल्या गर्लफ्रेंडशी गुपचूप लग्न उरकल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे 56 वर्षीय बोरिस जॅानसन यांच्यापेक्षा त्यांची पत्नी 23 वर्षांनी लहान आहे. दोघांना एक मुलगाही आहे. पंतप्रधानांचे हे तिसरे लग्न ठरलं आहे. (British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds)

कॅरी सायमंड्स असं जॅानसन यांच्या पत्नीचं नाव आहे. त्यांच्या लग्नाला दोघांचा मित्रपरिवार व नातेवाईक उपस्थित होते. लग्नाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यांचा साखरपुडा 2019 मध्ये झाला आहे. तर 29 एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. कॅरी व जॅानसन यांच्या लग्नाबाबत ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा होती. मागील वर्षीच त्यांचं लग्न होणार होतं. पण कोरोनामुळे त्यांनी पुढील वर्षी लग्न करणार असल्याचे यापूर्वी चर्चा होती. त्याबाबतचे आमंत्रणही त्यांच्याकडून दिले जात होते. पण त्यांनी अचानक लग्न केल्याचे समोर आलं आहे. 

जॅानसन यांचं तिसरं लग्न

बोरिस जॅानसन यांचं खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे. त्यांचं हे तिसरं लग्न ठरलं आहे. एलेग्रा मोस्टिन-ओवेन या जॅानसन यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांनी मरीना व्हीलर यांच्याशी विवाह केला. त्यांना चार मुलंही आहेत. दोघांचा संसार 25 वर्ष चालला. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

पंतप्रधानांच्या पत्नी कोण आहेत?

ब्रिटनमधील 'इंडिपेंडंट' दैनिकांचे संस्थापक मॅथ्यू सायमंडस आणि जोसेफिन मॅकफी यांच्या कॅरी या कन्या आहेत. त्यांचं संपूर्ण बालपण लंडनमध्येच गेलं आहे. त्यांनी खासदार जॅक गोल्थस्मिथ यांच्या साथीने राजकारणात प्रवेश केला. हुजूर पक्षाच्या माध्यम अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे.

बोरिस जॅानसन यांच्या लंडनच्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॅरी यांचा महत्वााचा वाटा असल्याचे बोललं जात आहे. ब्रिटनचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॅान व्हिटिंगडेल यांच्यासोबतही त्यांनी काही काळ काम केलं आहे. हुजूर पक्षाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केले आहे. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून दूर जात सागरी जीव व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.

Edited By Rajanand More


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in