जीवनाश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणा, ममता यांचे मोदी सरकारला पत्र   - Bring prices of essential commodities under control, Mamata's letter to Modi government | Politics Marathi News - Sarkarnama

जीवनाश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणा, ममता यांचे मोदी सरकारला पत्र  

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बटाटा आणि कांद्याच्या यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याला पुन्हा अधिकार बहाल करावेत, असेही ममता बॅनर्जी यांनी आवाहन केले. 

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी नीट, जेईई आणि यूजीसी परीक्षेत हस्तक्षेप करावी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. आता त्यांनी सामान्यांच्या प्रश्‍नांवर केंद्राला पत्र धाडले आहे. जीवनावश्‍यक वस्तूं कायद्यातील सुधारणांवरून त्यांनी केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. कायद्यातील सुधारणांमुळे धान्यसाठा करणाऱ्या व्यावसायिकांना नफाखोरीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. 

बटाटा आणि कांदा यासारख्या आवश्‍यक वस्तूंच्या व्यवहारात नफेखोरी केली जात आहे. परिणामी वस्तूंची किंमत वाढत असून त्याच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पंतप्रधानांना चार पानी पत्र लिहले असून की जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असून सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत येत आहेत. 

केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत किंमत नियंत्रणात आणण्याबाबत हालचाली कराव्यात. अन्यथा कृषी वस्तूंचे उत्पादन, पुरवठा, वितरण, विक्री याबाबतचे अधिकार राज्यांना बहाल करावेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या मतांवर अद्याप कोणतिही प्रतिक्रिया आलेली नाही. 

सामान्य नागरिक महागाईखाली भरडला जात असताना पश्‍चिम बंगाल सरकार निमूटपणे पाहणार नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या असून ते सहन करण्यासारखे नाही. 
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री 

पत्रातील प्रमुख मुद्दे 
पंतप्रधानांना चार पानांचे पत्र 
नव्या सुधारणा कायद्यामुळे साठेबाजीला प्रोत्साहन 
कांदा, बटाटासारख्या वस्तूंवरील किंमतीच्या नियंत्रणाचे अधिकार राज्यांना द्या 
पश्‍चिम बंगाल सरकार स्वस्थ बसणार नाही 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख