बिहारपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही गंगेत वाहू लागले मृतदेह...गुढ उकलेना

गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Bodies floated down in Gaga river in Uttar Pradesh amid surge of Corona cases
Bodies floated down in Gaga river in Uttar Pradesh amid surge of Corona cases

लखनऊ : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये (Bihar) कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांचे दहन करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून गंगा नदीत मृतदेह सोडून दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. कालपर्यंत बिहारमधील नदीपात्रात मृतदेह आढळून येत होते. आज उत्तर प्रदेशमध्येही नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाला मात्र अद्याप याचे गुढ उकलले नाही. (Bodies floated down in Gaga river in Uttar Pradesh amid surge of Corona cases)

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. काही राज्यांमध्ये भयावह स्थिती आहे. त्यापैकी बिहार व उत्तर प्रदेशातील आरोग्य सुविधांबाबत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या चाचण्यांपासून ते रुग्णांना बेड मिळणेपर्यंत अनेक अडथळे येत आहेत. आता रुग्णांच्या मृतदेहाचे दहन करण्यातही अडथळे येत असल्याची स्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतदेह कोरोनाबाधितांचे आहे की नाहीत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नसला तरी स्थानिक नागरिकांनी हे मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असावेत, असे म्हटले आहे.

कालपर्यंत बिहारमधील नदी पात्रात मृतदेह वाहून येत होते. बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 'जवळपास 40 ते 50 मृतदेह तरंगताना दिसले,' असे चौसा येथील अशोक कुमार या अधिकाऱ्यांनी सांगितले. चौसा येथील महादेव घाट परिसराती हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या भागात 100 हून अधिक मृतदेह वाहत आले असावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. मृतदेह मागील पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याचे दिसते. 

आता उत्तर प्रदेशातही असे मृतदेह आढळून येऊ लागले आहेत.  गाझीपूर जिल्ह्यामध्ये हे मृतदेह आढळून आल्याचे जिल्हाधिकारी एम. पी. सिंग यांनी सांगितले. 'आमचे अधिकारी त्याठिकाणी आहेत. हे मृतदेह कुठून वाहून आले, याचा शोध घेतला जात आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान काल बिहारमधील अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशकडे बोट दाखवले होते. उत्तर प्रदेशमधूनच बिहारमध्ये मृतदेह वाहून येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरून दोन राज्यांमध्ये जुंपली आहे. मात्र, अद्याप या घटनेचे गुढ उकलले नाही.

स्थानिकांमध्ये भीती

नदीत मृतदेह वाहून येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हे मृतदेह कोरोनाबाधित नागरिकांचे आहेत किंवा नाहीत, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिकांना संसर्गाची भीती आहे. पाण्यातूनही संसर्ग होण्याची भीती असल्याने नागरिक नदीपात्रात जाण्यासही घाबरत आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com