वाझेसोबत 'वसुली वसुली' खेळ खेळण्यातच सरकारचा वेळ गेला...राम कदमांचा आरोप - Bodies of 22 Covid victims in Beed stuffed into single ambulance Ram Kadam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

वाझेसोबत 'वसुली वसुली' खेळ खेळण्यातच सरकारचा वेळ गेला...राम कदमांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

बीडमधील प्रकार पाहून वाटतेय की महाराष्ट्राच्या भूमीत चाललयं काय...

मुंबई : महाराष्ट्रात तीन वसुली पक्षांच्या निष्काळजीमुळे अनेकांचे जीव हॅास्पीटलच्या दारात तडफडून जात आहे. मेल्यानंतर तरी शवाचा सन्मान करा. सचिन वाझेसारख्या  लोकांना पकडून त्याच्यासोबत 'वसुली वसुली' हा खेळ सरकाला खेळायचा होता. यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती झाली. हे तीनही पक्ष या वाईट परिस्थितीला जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे.

बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर राम कदम बोलत होते.  

हॅास्पीटलमध्ये बेड, अॅाक्सिजन नाही, हा सरकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शवाचा सन्मान करण्याची पद्धत देशात आहे. पण बीडमधील  हा प्रकार पाहून वाटतेय की या महाराष्ट्राच्या भूमीत चाललयं काय, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : लस स्वस्त होणार ? मोदी सरकारकडून सिरम व भारत बायोटेकची विनवणी
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. पण केंद्र सरकारला केवळ 150 रुपयांत लस दिली जात असताना राज्यांसाठी ही किंमत वाढविण्यात आली. त्यामुळे लशीची किंमत कमी करण्याची मागणी बहुतेक राज्यांनी केली आहे.  लशीच्या किंमतीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सिरम व भारत बायोटेककडून त्यावर खुलासाही करण्यात आला. पण राज्यांकडून ही किंमत अधिक असल्याने कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. देशभरात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी लशीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे. राज्यांना या कंपन्यांकडून अतिरिक्त लस खरेदी करावी लागणार आहे. पण किंमत अधिक असल्याने राज्यांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख