लहान मुलांनाही 'ब्लॅक फंगस'चा धोका; गुजरातमध्ये 13 वर्षांच्या मुलावर शस्त्रक्रिया

देशभरात या आजाराचे हजारो रुग्ण आढळून येत असले तरी अद्याप लहान मुलांमध्ये हा आजाराची लक्षणे आढळून आल्याचे समोर आले नव्हते.
Black Fungus in 13 year boy first case in Gujrat
Black Fungus in 13 year boy first case in Gujrat

अहमदाबाद : कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस (Black Fungus) हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. आतापर्यंत लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्याचे समोर आले होते. पण गुजरातमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाला या आजाराने विळखा घातला आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. (Black Fungus in 13 year boy first case in Gujrat)

महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळं या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये होणार आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना कराव्या लागणार आहेत. केंद्र सरकारने तसे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. 

देशभरात या आजाराचे हजारो रुग्ण आढळून येत असले तरी अद्याप लहान मुलांमध्ये हा आजाराची लक्षणे आढळून आल्याचे समोर आले नव्हते. अहमदाबाद येथील 13 वर्षाच्या मुलाच्या नाकात बुरशी आढळून आली होती. या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्या नाकावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मुलाच्या आईचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. 

मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून तो बरा झाल्यानंतर दीड महिन्यांनी त्याच्यामध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आली. अहमदाबादमदील लहान मुलांचे डॅाक्टर चेतन त्रिवेदी म्हणाले, यापू्र्वी लहान मुलांमध्ये हा आजार आढळला नव्हता. इथे ही पहिलीच केस आहे. त्यामुळे या आजाराला आता खूप गांभिर्याने घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

काय आहे हा आजार?

म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात. म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी लागणारी अनेक औषधे महाग आहेत. सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. हा नवीन आजार नाही. पण पूर्वी या आजाराचे रुग्ण तुरळक होते. कोरोनानंतर अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.

हा आजार संसर्गजन्य आजाराप्रमाणे (साथीच्या आजाराप्रमाणे) पसरण्याचा धोका डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. म्युकरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे. काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकरमायकोसिस या आजाराला म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. हळू हळू ते अवयव पूर्णपणे निकामी होतात. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com