६०० कोटींचा घोटाळा करून भाजपचे 'हेलिकॉप्टर बंधू' फुर्रर्र 

कंपनीत गुंतवलेले पैसे १२ महिन्यात दुप्पट करून दिले. मात्र, त्यानंतर जास्त पैसे गुंतवणूक करण्याची लालसा लागल्यानंतर त्यांनी अनेकांची फसवणूक केली.
 BJP's 'helicopter brothers' abscond after scam of Rs 600 crore .jpg
BJP's 'helicopter brothers' abscond after scam of Rs 600 crore .jpg

नवी दिल्ली : भाजपच्या (Bjp) व्यापारी संघाचे नेते मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या 'हेलिकॉप्टर बंधूं'वर ६०० कोटी (helicopter brothers) रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे दोघेही फरार असल्याने 'हेलिकॉप्टर बंधू' विरोधात जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा व्यवस्थापक श्रीकांत याला पोलिसांनी अटक केली आहे. वादानंतर भाजपने गणेशला पदावरून हटवले आहे. (BJP's 'helicopter brothers' abscond after scam of Rs 600 crore)  

तामिळनाडुतील तिरूवरूरचे निवासी असलेले हे हेलिकॉप्टर बंधू सहा वर्षांपूर्वी कुंभकोणमला राहण्यास आले होते. येथे ते डेअरीचा व्यवसाय करत होते. त्या दोघांनी सिंगापूर आणि अन्य देशात आपला व्यवसाय वाढवला. त्यांनी 'विक्ट्री फायनान्स नावाची कंपनी' सुरु केली. अर्जुन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड नावाने २०१९ मध्ये कंपनी रजिस्टर केली. कंपनीच्या माध्यमातून पैसे दुप्पट करुन देतो म्हणून लोकांची फसवणूक केली.

त्यांनी मागच्या काही वर्षात कंपनीत गुंतवलेले पैसे १२ महिन्यात दुप्पट करून दिले. मात्र, त्यानंतर जास्त पैसे गुंतवणूक करण्याची लालसा लागल्यानंतर त्यांनी अनेकांची फसवणूक केली. यासाठी दोन्ही बंधूनी अनेक दलालांची नियुक्ती केली होती. यासाठी दलालांना जास्तीत जास्त कमिशन दिले जात होते. त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि श्रीमंत व्यक्तींनी आमिषाला बळी पडत कंपनीत गुंतवणूक केली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मागच्या वर्षी लोकांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनीला कोरोनामुळे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे मिळत नसल्याचे दिसताच काही गुंतवणूकदारांना शंका आली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणात जफरुल्लाह आणि फैराज बानो या दांमत्याचीही फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यानी पोलिसात तक्रार दिली. जफरुल्लाह म्हणाले, त्या फायनान्स कंपनीत आम्ही १५ कोटी जमा केले होते. मात्र, आमचे पैसे मिळाले नाही. पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी आम्हाला धमकी दिली, असा आरोप त्यांनी केला. जफरुल्लाह यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com