ममता बॅंनर्जीविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला  - BJP workers protesting against Mamata Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ममता बॅंनर्जीविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

राज्यात भाजप विरूद्ध सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ भाजपने आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयातवर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला वेगळे वळण लागले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करण्याबरोबर पाण्याची फवारणी आणि लाठीमारही करावा लागला. 

राज्यात भाजप विरूद्ध सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे सत्ता खेचून आणायची आहे. गेल्या लोकसभेत चांगली कामगिरी केलेल्या या पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या एकाधिकारशाहीवर अनेक प्रश्‍न केले आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजप नेत्यानी केला आहे. 

काही दिवसापूर्वी एका भाजप कार्यकर्त्याचा खून झाला होता. यापूर्वीही अशाच हत्या झाल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. कोरोनाचे संकट आणि नियमाचे पालन मोर्चात का केले नाही याकडे या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून हल्ला केला. 

ते म्हणाले, की मोर्चात सहभागी झालेल्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने मास्क घातलेले होते. काय नियम आमच्यासाठीच आहेत का ? खुद्द मुख्यमंत्री बॅनर्जी या हजारो लोकांमध्ये सहभागी होता. सोशल डिस्टनिंगचे पालनही करीत नाहीत आणि त्या आम्हाला नियम शिकवितात हे योग्य नाही. 

नबन्ना हे बॅनर्जी यांचे कार्यालय आहे. "नबन्ना चलो' ची हाक भाजपचे युवा नेने लॉकेट चॅटर्जी यांनी दिली होती त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बरॅक तोडून जाण्याचा प्रयत्न केला असता आक्रमक कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्याबरोबरच पाण्याचा मारा आणि अश्रूधुराचा वापरही केला. 

पश्‍चिम बंगालमध्ये आजच्या आंदोलनावर तृणमूल पक्षाच्या नेत्यानीही टीका केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना कोरोनासाठी असलेल्या नियमाचे पालन केले नाही. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीचाही निषेध करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा भाजपनेही निषेध केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख