भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ७० जागाही मिळणार नाहीत : ममता बॅनर्जी - BJP will not get even 70 seats in West Bengal Mamata Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ७० जागाही मिळणार नाहीत : ममता बॅनर्जी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

भाजपाला २९४ जागांमधूनही ७० जागा मिळणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोलकाता : भाजपाला २९४ जागांमधूनही ७० जागा मिळणार नाही, असे  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. जलपायगुडी जिल्ह्यातील डाबग्राम-फुलबाडी येथील सभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या,  '' पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की १३५ जागांपैकीच १०० जागा जिंकल्या आहेत. परंतु, मी सांगते की भाजपाला २९४ जागांमधूनही ७० जागा मिळणार नाही. भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. '' 

ममता म्हणाल्या, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे, की आतापर्यंत ज्या १३५ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. त्यात भाजपने आधीच १०० जागा जिंकल्या आहेत. मात्र, मी सांगते, की निवडणूक संपल्यानंतर, भाजपला एकूण २९४ जागांपैकी ७० जागाही मिळणार नाहीत.''

''गृहमंत्री अमित शाह दार्जिलिंगच्या लेबोंगमध्ये म्हणाले होते, की कुठल्याही प्रकारची एनआरसी होणार नाही. त्यांनी म्हटले आहे, की 14 लाख लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांना राष्ट्रीय नागरिक रजिस्टरअंतर्गत अवैध प्रवासी शोधण्यासाठी प्रक्रियेच्या आधारे डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. पण १४ लाख लोकांना डिटेंशन सेंटरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे, मात्र, तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही. आपण सर्व जण नागरिक आहात,'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेत्यांच्या सभा, रोड शोमध्ये शारीरिक अंतर, मास्कचा वापर या नियमांची पायमल्ली होत आहे. पण त्याकडे केंद्रीय निवडणूक आयोग, पंतप्रधानांसह सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे.

बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दररोज रुग्णसंख्येचे नवे विक्रम होत आहेत. निवडणूक आयोगाने केवळ कागदावर नियमावली जाहीर करून पक्षांना दिली. पण त्याचे पालन होत आहे किंवा नाही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अखेर उच्च न्यायालयानेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त करत प्रशासनाला फटकारले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख