कोण म्हणतं योगींची जादू कमी झाली? : 75 पैकी 65 जिल्हा परिषदांत भाजपचा अध्यक्ष - BJP sweeps zilla panchayat samiti president elections in Uttar Pradesj | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

कोण म्हणतं योगींची जादू कमी झाली? : 75 पैकी 65 जिल्हा परिषदांत भाजपचा अध्यक्ष

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

योगींसाठी दिलासा देणारे निकाल.. 

लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे मुख्यमंत्रीपदाचे आसन अस्थिर झाल्याची चर्चा त्यांच्यासाठी दिलासा देणारे निकाल जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपद निवडणुकीत आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 76 पैकी 65 जागा जिंकून भाजप येथे हाडी मारली आहे. समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यातही भाजपला यश मिळाले आहे. भाजपचे तब्बल  21 उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. आज शनिवारी 53 जागांवर मतदानानंतर भाजपने आपले यश अधिक मोटे केले. (BJP`s big victory in Uttar Pradesh in Zilla Panchayat president elction) 

75 पैकी 65 जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले आहेत.  समाजवादी पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. इतरांनी चार जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाचे बालेकिल्ला मानले जाणारे मैनपुरी, रामपूर, बदायूं आणि आझमगड येथ पक्षाला झटका बसला. कॉंग्रेसला रायबरेलीत पराभूत व्हावे लागले.  सपाचे महत्त्वाचे बालेकिल्ले हातातून गेल्याने अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

त्तेची सेमीफायनल भाजपनेच जिंकली
उत्तर प्रदेशच्या सत्तेचे सेमीफायनल मानल्या जाणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळाला. भाजपशी युती करणाऱ्या अपना दल (एस) नेही दोन पैकी एक जागा जिंकली आहे. बसपचे माजी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह जौनपुरमध्ये जिंकल्या आहेत. यासह समाजवादी पक्षाने प्रतापगडमध्ये बलिया आणि आझमगड, रघुराज प्रतापसिंग ऊर्फ ​​राजा भैया यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. जेव्हा त्यांचा पक्ष जनसत्ता दलाने खाते उघडले, तर बागपतमध्ये आरएलडीला विजय नोंदविण्यात यश आले.  आगामी विधानसभांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या आधीच्या निवडणुकांत समाजवादी पक्षाने 63 जागा जिंकून विक्रम नोंदविला होता. तो विक्रमही भाजपने आज मोडला. शेतकरी कायद्याला विरोध करणारे राजेंद्रसिंह टिकैत यांच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातही भाजपनेच आपला अध्यक्ष केला. या निकालाबद्दल योगींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी समाधान व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख