भाजप प्रदेश नव्या कार्यकारीणीची आज पहिली बैठक...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे. दिल्ली येथून जे. पी. नड्डा हे बैठकीत सहभागी होतील, तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
3J_P_Nadda_0.jpg
3J_P_Nadda_0.jpg

मुंबई :  महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक आज होत आहे. भारतीय जनता पक्षाने ता. ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारीणीची ही पहिलीच बैठक आहे.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.   दिल्ली येथून जे. पी. नड्डा हे बैठकीत सहभागी होतील, तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच झालेला दिल्ली दैारा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर केलेली टिका, सरकार पाडून दाखविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आव्हान आदी विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. अनेक विषयावर होत असलेल्या या बैठकीकडे भाजपसह महाविकास आघाडीचेही लक्ष आहे. 

केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांची वर्णी लागण्याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या सर्वांत शक्तीशाली अशा संसदीय मंडळात नियुक्ती होण्याची कुजबुज आहे.  पक्षाध्यक्षांच्या गोटातून समजलेल्या माहितीनुसार नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा या महिन्यात होण्याची शक्‍यता अंधूक असून ती ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास होऊ शकते. 


चर्चेत ज्या विनोद तावडे यांचे नाव चालविण्यात आले ते सध्याही राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेतच. भाजप संकेतस्थळावरील कार्यकारिणी यादीत एकनाथ खडसे यांच्यानंतर व पी. राधाकृष्णन यांच्या आधी तावडे यांचे नाव दिसत आहे. भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने अमित शहा यांना गृहमंत्री केल्यावर जे. पी. नड्डा यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून भाजपच्या बहुप्रतीक्षित ‘टीम जे. पी. नड्डा’ ची घोषणा होण्याची चर्चा वारंवार सुरू आहे.

मात्र कोरोना व चीनच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार आगामी संसद अधिवेशनाच्या पुढेमागे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तर त्याच सुमारास कार्यकारिणीचीही घोषणा होईल. मुंडे यांना महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com