भाजपच्या नवविवाहित सरपंचाचे पत्नीसोबत सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फोटोशूट अन् घडलं भलतंच... - BJP Sarpanchs photoshoot with newlywed wife in a government helicopter | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या नवविवाहित सरपंचाचे पत्नीसोबत सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फोटोशूट अन् घडलं भलतंच...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

सरकारी हेलिकॉप्टर ठेवण्याची निश्चित जागा आहे. तिथे कोणालाही अनधिकृतपणे प्रवेश करता येत नाही.

रायपूर : भाजपच्या सरपंचाने नवविवाहित पत्नीसोबत सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फोटोशूट केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक विभागाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. 

छत्तीसगडमधील जशपूर येथील ढोंढी बाहर गावचे सरपंच संकेत साय यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला आहे. साय यांनी रविवारी पोलिस लाईनमध्ये असलेल्या सरकारी हेलिकॉप्टरमध्ये पत्नीसोबत फोटोशूट केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाहन चलाक योगेश्वर साय हा दोघांना तिथे घेऊन गेला होता. त्यानंतर बराच वेळ फोटोशूट सुरू होते. पण त्यावेळी कोणत्याही अधिकाऱ्याने त्यावर आक्षेप घेतला नाही. फोटोशूटमधील काही फोटो समोर आल्यानंतर या प्रकार उघडकीस आला. 

हेही वाचा : काँग्रेसच्या हातातून गेलं पण भाजपचं कमळही फुललं नाही!

सरकारी हेलिकॉप्टर ठेवण्याची निश्चित जागा आहे. तिथे कोणालाही अनधिकृतपणे प्रवेश करता येत नाही. पण तरीही तिथे फोटोशूट झाल्याने नागरी विमान वाहतूक विभाग व हेलिकॉप्टर सुरक्षा विभागात खळबळ उडाली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि प्रवक्ते विकास तिवारी यांनी नागरी विमान वाहतूक विभागाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर विभागाचे संचालक नीलम नामदेव एक्का यांनी कॅप्टन पंकज जयस्वाल यांच्या अध्यक्षेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली. ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करले. 

हेही वाचा : काँग्रेसचं सरकार कोसळलं, आणखी एक राज्य हातातून गेलं...

पोलिस लाइन विभागाचे चालक योगेश्वर साय यांनीच दोघांना हेलिकॉप्टरपर्यंत पोहचले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवरही कारवाई केली जाईल, असेही एक्का यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, संकेत साय हे भाजपाचे माजी आमदार व जशपूरचे जिल्हाध्यक्ष रोहित साय यांचे भाचे आहेत. संकेत यांची आई सुशीला साय या पंचायत समिती सदस्य आहेत. तर संकेत हा जशपूर जिल्ह्यातील ढोंढी बाहर गावचा सरपंच आहे. योगेश्वर सायही त्यांचा नातेवाईक आहे. या ओळखीतूनच सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फोटोशूट झाल्याचे सांगितले जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख