मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे भांडवल करू नका.. 

मनसुख हिरेन यांची आत्महत्या कि हत्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
mansukh6.jpg
mansukh6.jpg

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा व ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. मनसुख यांची आत्महत्या कि हत्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.  

"मनसूख हिरेन यांचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबत सगळ्याच्या मनात शंका आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी योग्य चैाकशी करण्यात येईल. सरकारच्या प्रतिमेसाठी लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यांच्या मृत्यूचे भांडवल करू नका.." असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

मनसुख यांच हात पाठीमागे बांधलेले होते. मनसुख यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे हजर होते, असे अनेक भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत केले. त्यांच्या कुटुंबियांनीही याबाबत पोलिसांनी माहिती दिली. या माहितीनुसार मनसुख हे दुकानात असताना त्यांना कांदिवलीतून तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. ८: ३० च्या सुमारास याबाबत त्यांनी घरातल्यांना कळवून रिक्षाने दुकानाबाहेर पडले. माञ राञी उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर सकाळी मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.  मनसुख यांचा मृतदेह ज्या वेळी खाडीतून बाहेर काढला. त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क होते. मनसुख यांचा मोबाइल हा मृतदेहासोबत सापडलेला नाही. मनसुख याला आलेल्या फोनची माहिती मिळवून हा कांदिवलीचा तावडे कोण, याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मनसुखच्या मोबाइलचा CDR काढून तपास करणार आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी तीन पथक नेमली आहेत. त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज  तपासले जात आहे.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्काॅर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. काल रेतीबंदर या ठिकणी श्री. हिरेन यांचा मृतदेह सापडला. अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलीस, मुंबई तसेच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत, असेही देशमुख म्हणाले. 

विरोधी पक्षाने या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसच्या 'एटीएस'कडून करण्यात येईल. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com