भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना कोरोना

पात्रा हे नियमितपणे भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतात त्याचप्रमाणे ते विविध वाहिन्यांवर भाजपची बाजू मांडत असतात.
bjp national spoke person dr sambit patra tested as corona positive
bjp national spoke person dr sambit patra tested as corona positive

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना कोवीड 19 वैश्विक महामारीचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. पात्रा यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा भारतातील प्रकोप वाढत चालला असून रूग्णसंख्या 1 लाख 60 हजारांवर पोहोचली आहे.

सुरुवातीच्या काळातील वसुंधराराजे/ दुष्यंत सिंग प्रकरण वगळता आतापर्यंत राजधानीतील राजकीय वर्ग यापासून वाचल्याचे दिसत होते. मात्र पात्रा यांच्या कोरोना संक्रमणाबाबतचे वृत्त म्हणजे कोरोनाने आता राजकीय नेत्यांभोवतीही विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे लक्षण मानले जाते. मात्र भाजपमधून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.

पात्रा हे नियमितपणे भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतात त्याचप्रमाणे ते विविध वाहिन्यांवर भाजपची बाजू मांडत असतात. या निमित्ताने त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. मागच्याच आठवड्यात त्यांनी काही निवडक पत्रकारांशी गप्पांची मैफल जमवली होती. पात्र यांना आज मेदांता रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच या पत्रकारांची पाचावर धारण बसली आहे. पात्र यांना गेल्या दोन-तीन दिवसापासून खोकला आणि बारीक ताप येत होता अशी माहिती मिळाली आहे. मेदांता रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी पात्रा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार
पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नेतृत्वबदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त आहे. नुकतीच पटोले यांनी केलेली दिल्लीवारी हा त्या घडामोडींचा भाग असल्याचे मानले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. अनेक नेत्यांनी पक्षांतरे करूनही काँग्रेसला नुकसान झाले नाही. 2009 च्या तुलनेत 2 जागा जास्त निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोडी झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रीपद मिळाले. ते सद्या प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्रीपद या दोन्ही जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात पक्षाच्या बांधणीचे आव्हान लक्षात घेता स्वतंत्रपणे प्रदेशाध्यक्ष नेमणे आवश्यक बनले आहे. त्याचाच भाग म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या नेत्याचा शोध सुरू आहे. या जागेसाठी सुरवातीपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चित आहे. मात्र ते या पदासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांच्या नावावर एकमत झाले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com