लक्षात ठेवा, तुम्हालाही दिल्लीत यावे लागते; भाजप खासदाराची ममतांसह तृणमूलला धमकी    - BJP MPs criticize Trinamool Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

लक्षात ठेवा, तुम्हालाही दिल्लीत यावे लागते; भाजप खासदाराची ममतांसह तृणमूलला धमकी   

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.  भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) समर्थक भाजप (BJP) समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा दावा केला आहे. या हिंसाचाराच्या घटने नंतर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत यावे लागते हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे. BJP MPs criticize Trinamool Congress

हे ही वाचा : आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार

या हिंसाचारात ९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपबरोबरच डाव्या पक्षांनीही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. २ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर कोलकातामधील भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपच्या कार्यकार्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

हे ही वाचा : आता 'महाविकास'चा करेक्ट 'कार्यक्रम होणार' का? 

त्यावर ट्वीट करत परवेश साहिब सिंह यांनी म्हटले आहे की, ''निवडणूक जिंकल्यानंतर तृणमूलच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांचे जीव घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांची त्यांनी तोडफोड केली. लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना आणि आमदारांना दिल्लीतही यावे लागते. याला इशारा समजा. निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय होत असतात, हत्या होत नाहीत'', असे सिंह यांनी म्हटले आहे.

 राज्याच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप या वेळी ममतांनी केला. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्या पक्षाला ५० जागांचा टप्पा ओलांडणेही कठीण झाले असते, असे त्या म्हणाल्या.  
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख