भाजपच्या खासदार, अभिनेत्री  किरण खेर यांना ब्लड कॅन्सर ...  - bjp mp kirron kher suffering from blood cancer  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या खासदार, अभिनेत्री  किरण खेर यांना ब्लड कॅन्सर ... 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

मुंबईच्या कोकिलाबेन हॅास्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

चंडीगढ : चंडीगढच्या भाजप खासदार अभिनेत्री किरण खेर (Kirron kher)या सध्या ब्लड कॅन्सरशी लढा देत आहे. चंड़ीगढ भाजपचे अध्यक्ष अरुण सूद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. किरण खेर या मल्टीपल माइलोमा (Multiple Myeloma)या ब्लड कॅन्सरशी लढत आहे. मुंबईच्या कोकिलाबेन हॅास्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

अरुण सूद यांनी सांगितले की, ६८ वर्षीय किरण खेर या गेल्या वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी चंडीगढ येथील घरी किरण खेर यांचा हाताला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांना कॅन्सर (मल्टीपल माइलोमा) झाल्याचे निदान झाले. ४ डिसेंबर रोजी त्यांना मुंबईत कोकिळाबेन हॅास्पीटल येथे दाखल करण्यात आले.

नुकत्याच केलेल्या उपचारात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चार महिन्याच्या उपचारानंतर आता त्यांना हॅास्पीटलमध्ये दाखल करण्याची गरज नाही, अधून मधून त्या तपासणीसाठी कोकिळाबेन हॅास्पीटलमध्ये जात असतात.
 
किरण खेर या 2014  च्या निवडणुकीत पहिल्यांदा चंडीगढ़ लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी कॅाग्रेसचे पवन बंसल आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार गुल पनाग यांचा पराभव केला होता.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख