भाजप खासदार नंदकुमार सिंह चैाहान यांचे निधन - bjp mp from khandwa nandkumar singh chauhan died | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजप खासदार नंदकुमार सिंह चैाहान यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मार्च 2021

खासदार नंदकुमार सिंह चैाहान यांचे आज निधन झाले. खंडवा लोकसभा मतदार संघातून ते निवडून आले होते.

भोपाल : भाजप मध्यप्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष, खासदार नंदकुमार सिंह चैाहान यांचे आज निधन झाले. खंडवा लोकसभा मतदार संघातून ते निवडून आले होते. ता. 11 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भोपाल येथे उपचार सुरू होते. 

काही दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना एयर एम्बुलेंसने गुरूग्राम (दिल्ली) येथील मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचे आज निधन झाले. बऱ्हाणपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.

नंदकुमार सिंह चैाहान हे 'नंदू भैया' म्हणून समाजात लोकप्रिय होते. त्यांचा कोराना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

शिवराज सिंह यांनी याबाबत टि्वट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवराजसिंह चैाहान म्हणाले की लोकप्रिय नेता नंदू भैया आम्हाला सोडून गेले. त्यांच्या निधनामुळे भाजपने एक लोकप्रिय, कुशल संघटक, आदर्श कार्यकर्ता गमावला आहे. नंदू भैया यांच्या जाण्याने मला व्यक्तिगत दुःख झाले आहे.  
    
मध्यप्रदेशातील राजकारणात त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यांनी 1996 मध्ये खंडवा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. यात ते विजयी झाले होते. त्यानंतर 12, 13, आणि 14 व्या लोकसभेचे ते सदस्य होते. 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अरूण यादव यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर नंदू भैया हे 17 व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि नंदू भैया हे चांगले मित्र होते.  
  
Edited  by :  Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख