भाजप आमदाराचे निधन... मुलगा म्हणाला, ""धन्यवाद युपी सरकार, धन्यवाद मोदीजी..." - BJP MLA Kesar Singh Gangwar passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

भाजप आमदाराचे निधन... मुलगा म्हणाला, ""धन्यवाद युपी सरकार, धन्यवाद मोदीजी..."

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

विशाल गंगवार म्हणाले, "धन्यवाद युपी सरकार आणि धन्यवाद मोदीजी..."

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले, बरेलीमधील नवाबगंज विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले होते. केसर सिंह यांच्यावर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांनी लिहिलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी हे पत्र लिहिले होते. ता. १२ एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाली होती.  त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना त्यांनी पत्र लिहून त्यात मॅक्स रुग्णालयात उपचार घेण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना मॅक्स रुग्णालयात बेड मिळाला नाही. पण बरेलीच्या प्रशासनाने त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्यात आला होता. 

केसर सिंह गंगवार यांचे चिंरजीव विशाल गंगवार यांनी यावर संताप व्यक्त करून उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. विशाल गंगवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन लावून बेडबाबत विचारणा केली होती. पण त्यांचा अपेक्षीत उत्तर मिळाले नाही. सोशल मीडियावर याबाबत विशाल यांनी हा प्रकार व्हायरल केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकार यांनी गंगवार यांच्यासाठी धावफळ करण्यास सुरवात केली. पण त्यांना नोएडा दाखल करण्यात आले. विशाल गंगवार म्हणाले,  "धन्यवाद युपी सरकार आणि धन्यवाद मोदीजी..."

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपध्यक्ष स्वतंत्र देव  यांनी गंगवार यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.  कोरोनामुळे निधन झालेले गंगवार हे उत्तरप्रदेशातील भाजपचे  तिसरे उमेदवार आहेत. आमदार रमेश दिवाकर, आमदार सुरेश श्रीवास्तव या आमदारांचेही काही दिवसापूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. सुरेश श्रीवास्तव यांच्या पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख