उत्तर प्रदेशच्या भाजप आमदारानं केलं 'हे' धक्कादायक वक्तव्य - BJP UP MLA Disrespectfully Comments on Women | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

उत्तर प्रदेशच्या भाजप आमदारानं केलं 'हे' धक्कादायक वक्तव्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मार्च 2021

मुलं तुम्ही जन्माला घालता....मग सरकारनं त्यांच्या शिक्षणाचा भार का उचलावा, असं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशचे आमदार रमेश दिवाकर यांनी महिलांशी बोलताना केले आहे. या वक्तव्यावरून त्यांना सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. 

लखनौ : मुलं तुम्ही जन्माला घालता....मग सरकारनं त्यांच्या शिक्षणाचा भार का उचलावा, असं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशचे आमदार रमेश दिवाकर यांनी महिलांशी बोलताना केले आहे. या वक्तव्यावरून त्यांना सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. 

औरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिवाकर यांना काही महिला भेटायला गेल्या होत्या. खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण शुल्क माफ करावं, अशी या महिलांची मागणी होती. त्यावर दिवाकर यांनी वरीलप्रमाणं धक्कादायक वक्तव्य केलं. बच्चे आप पैदा करो और रुपया हम दे....असं दिवाकर एका महिलेला उद्देशून बोलताना रेकाॅर्ड करण्यात आलं आहे.

तुमच्या मुलांसाठी सरकारी शाळा आहेत. तिथं पैसे आकारले जात नाहीत. तुम्ही आमच्याकडं फक्त पैसा आणि शिफारसींसाठीच येता. वास्तविक सरकार तुम्हाला अन्न-कपडे सगळं पुरवतं आहे, असंही हा आमदार या महिलांना म्हणाल्याचं ध्वनीमुद्रीत झालं आहे. त्यावर याच जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे, असं गर्दीतल्या एका महिलेनं त्यांना सुनावलही.

याबाबत भाजपचे प्रवक्ते समीर सिंग यांनी खुलासा केला आहे. ''मला किंवा पक्षाच्या नेत्यांना याबाबत काही माहिती नाही. मात्र, कुणालाही महिलांशी अशा पद्धतीनं बोलण्याचा अधिकार नाही. आमचा पक्ष सर्व समाजाचा आदर  करतो. या प्रकरणात काही तक्रार आल्यास संबंधितांची चौकशी केली जाईल,'' असे सिंग यांनी सांगितले आहे. दुसरीकडं समाजवादी पक्षायचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी आमदारांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख