कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची चाचपणी सुरु ; या नावाची चर्चा

वादग्रस्त चेहरा नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकते, यासाठी सध्या भाजप चाचपणी करीत आहे.
11Sarkarnama_20Banner_20_2893_29_0.jpg
11Sarkarnama_20Banner_20_2893_29_0.jpg

बंगळूर : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटविण्यासाठी हालचाली सुरू असताना त्यांच्या जागी भाजप (BJP)कोणाची वर्णी लावणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. वादग्रस्त चेहरा नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकते, यासाठी सध्या भाजप चाचपणी करीत आहे. bjp looking for non controversial face in karnataka after bs yediyurappa

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अग्रेसर असल्याचे समजते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना प्रल्हाद जोशी हे बंगळूर येथे रवाना झाले आहे. ते येथील आमदारांच्या संपर्कात आहेत. कर्नाटकातील जातीय समीकरणाच्या आधारे लिंगायत किंवा वोक्कालिगा समाजातील नेता या पदी विराजमान होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरुन दुर होण्यास तयार असले तरी भाजपच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचे हे भाजपसमोर नवे संकट आहे. प्रमुख नेता बसवराज बोम्मई आणि बी.एल. संतोष यांची नावेही चर्चेत आहेत. पण प्रल्हाद जोशी यांचे नाव सर्वात पुढे आहे, पण राज्यातील नेत्यावर असलेली त्यांची पकड किती आहे याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींना शंका आहे. कर्नाटकमधील जातीय समीकरणं आणि भाजपसमोरील सध्याच्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाची नेमणूक पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांना पक्ष नेतृत्वाने राजीनामा द्यायला लावल्यास काही मंत्री राजीनामा देतील, अशी चर्चा सुरू आहे. यात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडी सरकारमधून भाजपमध्ये आलेल्या मंत्र्यांचा समावेश असेल, अशी चर्चा सुरू आहे. याचबरोबर येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यास भाजपमध्ये फूट पडेल, अशहीही चर्चा सुरू आहे.  

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का.. 
मुंबई : कोकणासह मुंबई, मध्यमहाराष्ट्राला दोन दिवसापासून झोडपले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास दैाऱ्या केलेला नाही. यावरुन भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com