हैदराबाद : हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत जो कल आला आहे. त्यानुसार भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजप 85 जागांवर आघाडीवर आहे. तर टीआरएस २९, एमआयम १७ जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे हैदराबादमधून भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र महापालिका निवडणुकीत ओवैसींच्या एआयएमआयएम पक्ष पिछाडीवर पडला आहे. याठिकाणी भाजपनं मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.
हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपनं ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी आदींनी याठिकाणी प्रचार केला होता.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शाह, योगी आदित्यनाथ, यांनीही हैदराबाद महापालिका निवडणुक प्रचारात सहभाग घेतला होता.
अमरावतीत सरनाईकांची आघाडी कायम ! https://t.co/7s4gvcpFuX
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 4, 2020
हेही वाचा : शरद पवारांना टार्गेट केल्यानेच भाजपची उलटी गणती : शशिकांत शिंदे
सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निकालाने भाजपला चपराक बसली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदार शरद पवारांच्या विचारांच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिली आहे. महाराष्ट्राच्या या नेत्याला तुम्ही जेवढे लक्ष करण्याचा प्रयत्न कराल, तेवढी तुमची उलटी गणती सुरू होईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून अरूण लाड यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''धुळे - नंदूरबारचा निकाल आल्यावर प्रवीण दरेकरांपासून भाजपच्या सर्व नेत्यांनी आता महाविकास आघाडीची उलटी गणती सुरू असे म्हणायला सुरवात केली होती. मात्र, आतापर्यंतच्या निकालांनी त्यांना चपराक बसली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघावर आपलाच हक्क आहे, असे समजून चालणाऱ्यांना मतदारांनी योग्य निर्णय दिला आहे,''
''अरूण लाड यांच्या विजयाबद्दल मी सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांचे आभार मानतो. काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात होत्या. त्याकडे लक्ष न देता शरद पवारांच्या विचारांच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील या नेत्याला तुम्ही जेवढे लक्ष करण्याचा प्रयत्न कराल तेवढी तुमची उलटी गणती सुरू होईल,'' अशी चपराक आमदार शिंदे यांनी दिली आहे.

