मोदी, शाह यांचे नाव 'केडीएसए' ने धुळीला मिळवलं...भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

बंगालमध्ये भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-06T155819.567.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-06T155819.567.jpg

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.  तृणमूल कॅाग्रेसकडून झालेल्या पराभवाचे खापर ते एकमेंकांवर फोडत आहेत. बंगालमध्ये भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. BJP leaders accuse each other after defeat in Bengal Tathagata Rai

त्रिपुराचे माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय Tathagata Rai यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शिव प्रकाश, अरविंद मेनन आणि प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तथागत रॉय यांनी टि्वट करीत या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान ‘केडीएसए’ने केला आहे. या चारही नेत्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि गृहमंत्री अमित शाह Amit Shahयांचे नाव धुळीला मिळविले आहे. देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाची जगात नाचक्की केली आहे, अशी संतप्त भावनाही तथागत रॉय यांनी व्यक्त केली.

बंगालमधील भाजपचे जे नेते आहेत, त्यांना काहीही माहीत नाही, अशी टीका करीत रॉय यांनी राज्यात भाजप मागे पडण्याचे एक कारण म्हणजे भाजपच्या छताखाली आलेला तृणमूलमधील कचरा. भाजपचे कार्यकर्ते १९८०पासून पक्षासाठी सातत्याने काम करीत होते, त्यांना तृणमूल काँग्रेसचा त्रास सहन करावा लागत आहे. पण भाजपचे 'कैलास-दिलीप-शिव- अरविंद' (केडीएसए) त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाहीत, त्यांना काम करण्यास उभारीही दिली नाही. उलट ‘तृणमूल’मधून आलेल्या कचऱ्याला निवडणुकीचे तिकीट देण्यात आणि त्यांना सप्ततारांकित हॉटेलमध्ये आराम करता यावा, यासाठी ते झटत होते. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अत्याचार, छळाला सामोरे जावे लागत आहे, असे रॉय यांनी सांगितले.

पश्‍चिम बंगालमध्ये झालेली भाजपची हार पाहता पक्षात मोठे बदल केले नाहीत तर पक्ष मजबूत करण्यासाठी जे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करीत आहेत, तेही पक्षाला सोडून जाऊ शकतात. असे झाल्याने पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचा तो शेवट असू शकेल. भाजपच्या पराभवाला मी केंद्र सरकारला दोष देऊ शकत नाही, असे टि्वट रॅाय यांनी केलं आहे. 

Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com