भाजप आमदाराची पोलिसांत तक्रार...हिंदु-देवदेवतांचा अपमान... - bjp leadar ram kadam lodges a complaint against the makers of web series tandav at police station | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदाराची पोलिसांत तक्रार...हिंदु-देवदेवतांचा अपमान...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 जानेवारी 2021

खासदार मनोज कोटक यांच्यानंतर भाजपचे नेते राम कदम यांनी ‘तांडव’ या वेबसीरीजविरोधात आवाज उठविला आहे

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याची ‘तांडव’ ही वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी रिलीज झाली आहे. समाज माध्यमांवर या वेबसीरीजबाबत आता वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्यानंतर भाजपचे नेते राम कदम यांनी या वेबसीरीजविरोधात आवाज उठविला आहे. राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

खासदार मनोज कोटक सुध्दा मालिकेचे निर्माते, कलाकार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ‘तांडव’मध्ये हिंदु-देवदेवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप राम कदम आणि मनोज कोटक यांनी केला आहे. कदम यांनी या मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वेबसीरीजमधील कलाकार, व निर्मात्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी घाटकोपर पोलिसांकडे केली आहे. 

भगवान शिवशंकर आणि श्रीराम यांच्यावर टिपण्णी करण्यात आली असल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांच्याकडे या मालिकेबाबत तक्रार केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मालिकासाठी सेन्सासशीप असावी, अशी मागणी कोटक यांनी जावडेकर यांच्याकडे केली आहे. राजकारणावर आधारीत ‘तांडव’ मध्ये सैफ अली खान प्रमुख भुमिकेत आहे. तर अली अब्बास यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.     

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांकडून महाविकास आघाडीला घरचा आहेर.. 
 
डोंबिवली : निवडणुकीच्या रिंगणात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा मुद्दा कायमच चर्चिला गेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत असताना राष्ट्रवादीनेही रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी विधान करीत सेनेला घरचा आहेर दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख