भाजप 'तामिळी' नागरिकांचा सन्मान राखत नाही...

तामिळनाडूची तामिळ ही राज्य भाषा असून तरीही तामिळी जनतेवर तामिळनाडूत हिंदी लादण्याचा प्रताप भाजपकडून करण्यात येत आहे, असा आरोप राज्यसभा काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी गुरूवारी केला.
p chidambaram
p chidambaram

तामिळनाडू: तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून वातावरण चांगलेच पेटू लागले आहे. राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसते. भाजपकडून तामिळनाडूमध्ये तामिळऐवजी हिंदीची सक्ती केली जात असून भाजपकडून तामिळी नागरिकांचा यथोचित सन्मान राखला जात नाही, असा आरोप राज्यसभा काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी गुरूवारी केला. चिदंबरम म्हणाले, तामिळनाडूची तामिळ ही राज्य भाषा असून तरीही तामिळी जनतेवर तामिळनाडूत हिंदी लादण्याचा प्रताप भाजपकडून करण्यात येत आहे. असे केल्याने तामिळी लोकांचा अपमान भाजपकडून करण्यात आला आहे. 

चिदंबरम पुढे बोलताना म्हणाले, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्रा कळघम (AIADMK) यांनी १९९८ मध्ये भाजपसोबत युती (alliance) केली. मात्र ती फार काळ टिकली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व जयललिता यांच्या निधनामुळे त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली आहे. आपली प्रतिष्ठा व मानसन्मान राखण्याकरिता एआयएडीएमकेने भाजपशी केलेली युती तोडून टाकावी, असा सल्लाही चिदंबरम यांनी तामिळनाडूमधील पढूकोट्टाई येथील प्रचारसभेत दिला. 

चिदंबरम पुढे बोलताना म्हणाले, 'एआयएडीएमके गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून जयललिता यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व १०० कोटींचा दंड झाला होता. जयललिता यांना अटक झाली त्यावेळेस अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्रा कळघमचे एडाप्पडी के. पलानीस्वामी मंत्री होते की नाही, याबाबत मात्र मी अनभिज्ञ आहे'. दरम्यान, तामिळनाडू येथील आगामी विधानसभा निवडणुका ६ एप्रिलपासून होणार असून एकाच टप्प्यात त्या होतील. तर मतमोजणी २ मे रोजी होईल. २३४ जागांसाठी हे मतदान होणार असून काँग्रेस-डीएमके विरुद्ध भाजप-एआयएडीएमके अशीच थेट व चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com