भाजपला धक्का : दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव, आपचा दबदबा

दिल्लीत 2022 मध्ये महापालिका निवडणूक होणार असल्याने हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
BJP defeat in delhi municipal corporation election
BJP defeat in delhi municipal corporation election

नवी दिल्ली : गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. पाच जागांवर झालेल्या निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळालेली नाही. चार जागांवर आप तर एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. दिल्लीत 2022 मध्ये महापालिका निवडणूक होणार असल्याने हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

दिल्ली महापालिकेच्या पाच जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान झाले होते. जवळपास 50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्रिलोकपुरी, शालीमार बाग, रोहिणी सी, चौहान बांगड आणि कल्याणपुरी या पाच जागांसाठी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत आपने दोन्ही पक्षांवर मात केली आहे. पाचपैकी चार जागा यापूर्वी आपकडे होत्या. तर शालीमार बाग हा वॉर्ड भाजपच्या ताब्यात होता. हा वॉर्डही भाजपला राखता आलेला दिसत नाही.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार त्रिलोकपुरीमध्ये आपचे उमेदवार विजय कुमार यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा सुमारे पाच हजार मतांनी पराभव केला. तर शालीमार बागमध्ये आपच्या उमेदवार सुनिता मिश्रा यांनी भाजपच्या उमेदवारावर सुमारे 2700 मतांनी मात केली. त्यांना 9764 मते मिळाली आहे. रोहिणी सी वॉर्डमध्येही आपचा विजय झाला आहे. आपचे रामचंद्र यांी भाजपचे उमेदवार राकेश यांचा तीन हजार मतांनी पराभव केला.

चौहान बांगड या वॉर्डवर काँग्रेसने कब्जा केला आहे. जुबेर अहमद यांनी आपचे मोहम्मद इशराक यांचा सुमारे साडे पाच हजार मतांनी पराभव केला. कल्याणपुरीमध्ये आपचे धीरेंद्र कुमार 7043 मतांनी विजयी झाले आहेत. येथील भाजपचे उमेदवार सिया राम यांना 7259 मतं मिळाली आहेत. 

दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या सर्व 272 जागांसाठी पुढील वर्षी मतदान होणार आहे. त्यासाठी पाच जागांसाठी झालेले मतदान रंगीत तालीम समजली जात आहे. यामध्ये आपची सरशी झाली असून भाजप व काँग्रेसचा पराभव झाला आहे. भाजपच्या खात्यात पाचपैकी एकही जागा आली नाही. तर काँग्रेसला एक जागा खेचून आणण्यात यश आले आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com