बिहारमध्ये भाजप, कॉंग्रेसची यांनी वाढविली डोकेदुखी !  - BJP, Congress increase headaches in Bihar! | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये भाजप, कॉंग्रेसची यांनी वाढविली डोकेदुखी ! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

रामविलास पासवान हे केंद्रात मंत्री आहेत आणि ते एनडीएत आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर या राज्यात राजकीय हालचाली दिवसेदिवस गतीमान होत चालल्या आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेला लोक जनशक्ती पक्षांने नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे यूपीएमधून माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा हे बाहेर पडले आहेत. म्हणजेच कॉंग्रेस आणि भाजपची डोकेदुकी या दोन्ही पक्षांनी वाढविलेली आहे. 

रामविलास पासवान हे केंद्रात मंत्री आहेत आणि ते एनडीएत आहे. बिहारमध्ये भाजपच्या कोट्यातून त्यांना काही जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे. मात्र त्यांना 42 जागा , दोन विधान परिषद आणि यूपीतून एक राज्यसभा हवी आहे. ते देण्यास भाजप तयार नाही. दोन विधान परिषद आणि काही जागा सोडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखविली आहे. पासवान यांचे पुत्र चिराग यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र ते काही जागांसाठी हट्ट धरून बसले आहेत. भाजपने आपली मागणी पूर्ण केली नाही तर 146 जागा लढण्याची तयारी त्यांनी सुरू ठेवली असल्याचे समजते. 

कुशवाहा यांनी यूपीएला हात जोडले 
राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा हे यूपीएतून बाहेर पडले आहेत. तशी घोषणा त्यांनी केली आहे. आता बसप आणि इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत आणि मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुशवाहा हे पूर्वी एनडीएतही होते. ते एनडीएच्याही संपर्कात होते मात्र जागा वाटपाबाबत सहमती न बनल्याने त्यांनी आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आज दुपारी दोन वाजता मी माध्यमाशी बोलणार आहे. त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट करणार आहे. 

वास्तविक कुशवाहा यांना वाटत होते यूपीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून आपले नाव पुढे करावे. मात्र त्यांना सीएम पदाचे उमेदवार जावू द्या दहा ते बारा जागाच्या वर एकही जागा सोडण्यास राजद तयार नाही. राजदने स्पष्टपणे सांगितले, की तेजस्वी यादवच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील दुसरे कोणी नाही. राजदही किंमत देत नसल्याने कुशवाह यांनी यूपीएलाही रामराम केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख