बंगालमध्ये भाजप 100 च्या खाली..... प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरतो की काय?

किशोर यांचा दावा भाजप 100 जागा क्राॅस करणार नाही, असा आहे.
prashant kishor mamata
prashant kishor mamata

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेचे स्वप्न होते. त्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत बंगालमध्ये भाजपने तीन आकडी संख्या ओलांडली तरी आपण आपले निवडणूक स्ट्रटेजीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिले होते. तसेच दोन मे निकालाच्या दिवसापर्यंत माझे हे ट्विट जपून ठेवा, असेही ठामपणे सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे ठरते की काय, अशी स्थिती आता भाजपवर येत आहे.

प्रचंड ताकदीने भाजप या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे तेथील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी येथे प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. पण निकाला भाजपच्या मनासारखे अजिबात दिसत नाही. 

मतमोजणीच्या सुरवातीच्या कलामध्ये भाजपच्या जागा 124 वर दाखविण्यात येत होत्या. सकाळी 11 नंतर मात्र भाजपच्या जागा 90  च्या आसपास आल्या. त्याच वेळी तृणमुलच्या जागा या 160 च्या पुढे गेलेल्या होत्या. ममता या नंदीग्राममधून पिछाडीवर असल्यातरी पक्षाला त्यांनी आघाडीवर ठेवल्याचे चित्र आहे. भाजपच्या जागा जेव्हा शंभरच्या पुढे होत्या तेव्हा अनेक भाजप नेत्यांना प्रशांत किशोर यांची आठवण झाली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आता प्रशांत किशोर यांनी आपले काम सोडून द्यावे, असा सल्ला दिला. मात्र हा सल्ला देऊन काही मिनिटे संपण्याच्या आतच भाजपचा आकडा हा 100 च्या खाली आहे. त्याच वेळी तृणमूलला 184 जागा दाखविण्यात येत होत्या. 

प्रशांत किशोर हे या निवडणुकीत चर्चेत राहिले. बंगालमधील पत्रकारांसोबत केलेल्या चर्चेत त्यांनी भाजपची शक्तिस्थाने सांगितली आणि भाजपने येथे कसे पाय रोवले आहेत, याचे स्पष्टिकरण दिले होते. त्यावरून प्रशांत किशोर यांनी तृणमूलचा पराभव मान्य केल्याचा अर्थ काढला गेला. सव्वा अकराच्या सुमारास भाजपच्या जागांचा कलाचा आकडा हा 86 पर्यंत खाली घसरला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com