मोदींचे पुतळे जाळणे हे राहुल गांधीच्या बेशरमपणाचे नाटक...जे. पी. नड्डांची टीका 

आईकडून सभ्यता व लोकशाहीची फुसकी वक्तव्ये दिली जातात, तर दुसरीकडे मुलगा असत्य, द्वेष, संताप व खोटी आक्रमकता यांचे रोजच्या रोज असभ्य दर्शन घडवीत आहे.
rahul26.jpg
rahul26.jpg

नवी दिल्ली : पंजाबमध्ये दसऱ्यानिमित्त झालेल्या रावण दहनावेळी रावणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे चढविल्याच्या प्रकाराने भाजप संतप्त झाला आहे. पक्षाचेअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, हे राहूल गांधी दिग्दर्शित व निर्देशित बेशरमपणाचे नाटक होते, असे व्यक्तव्य करून हल्ला चढविला आहे. 

भारतीय राजकारणाची पातळी कॉंग्रेसने कधी नव्हे इतक्‍या खालच्या पातळीला आणून ठेवली, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. पंजाब मधील या प्रकारावर नड्डा यांनी ट्‌विट केले आहे. ते म्हणाले की ही घटना लाजिरवाणी असली तरी नीराशेची टोकाची पातळी गाठलेल्या कॉंग्रेसच्या बाबतीत ती अनपेक्षित नाही. नेहरू-गांधी घराण्याने पंतप्रधान कार्यालयाचा सन्मान कधीही ठेवला नाही हे पुन्हा दिसून आले. 2004-2014 मध्ये तेच दिसले. त्यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यादेश टरकावून-फाडून टाकण्यापर्यंत या घराण्याची मजल गेली होती. 

आता कॉंग्रेसमध्ये निराशा, हताशा व बेशरमपणा या दोन्हींचे घातक मिश्रण वारंवार दिसून येते. एकीकडे पक्षाचे नेतृत्व असलेल्या आईकडून सभ्यता व लोकशाहीची फुसकी वक्तव्ये दिली जातात, तर दुसरीकडे मुलगा असत्य, द्वेष, संताप व खोटी आक्रमकता यांचे रोजच्या रोज असभ्य दर्शन घडवीत आहे. राहूल गांधी भारताचे प्रतिनिधीत्व करतात का पाकिस्तानचे हेही अनेकदा समजत नाही. आणीबाणीत व राजीव गांधींच्या काळात तर प्रसारमाध्यमांवरही वेगवेगळे हल्ले करण्यात आले.

प्रकाश जावडेकर म्हणाले की राहूल गांधींना सत्ता न मिळाल्याची व ती आशा अधिकाधिक धूसर झाल्याची निराशा व चिडचिड कॉंग्रेसच्या राज्यात या पध्दतीने व्यक्त होणे लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे. पंतप्रधान देशाचे घटनात्मक नेतृत्व करतात. मात्र लोकशाहीचा अनादर करण्याची गांधी घराण्याची परंपराच नाही. भारतीय राजकारणाची पातळी इतक्‍या निम्न स्तरावर कधीही गेलेली नव्हती.


हेही वाचा : अभिनेत्री पायल घोषचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश रिपब्लिकन 

मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोषने पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी पायलची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. सिने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर पायल घोष ही चर्चेत आली होती. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com