गुजरातमध्ये लव्ह जिहादला प्रतिबंध...गृहमंत्री जडेजांची घोषणा.. - Bill Against love Jihad Gujarat Home Minister Pradipsinh Jadeja | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

गुजरातमध्ये लव्ह जिहादला प्रतिबंध...गृहमंत्री जडेजांची घोषणा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गुजरातमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्यात येणार आहे

गांधीनगर (गुजरात)  : देशभर लव्ह जिहादच्या घटना वाढत आहे, त्याला प्रतिबंध करण्यासाठी अनेक भाजपशासित राज्यांनी लव्ह जिहादचा कठोर कायदा आधीच मंजूर करून अस्तित्वात आणला आहे. आता गुजरातमध्ये देखील लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी  केली.

 गुजरात सरकार धार्मिक स्वातंत्र्य कायदा २००३ मध्ये दुरूस्ती करून नवा कायदा तयार करणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांपाठोपाठ आता गुजरातमध्येही हा कायदा होत आहे. या कायद्या मोडल्यास ३ ते ७ वर्ष शिक्षा होण्याची तरतूद आहे.  विवाहाला मदत करणारी संस्था, व्यक्ती यांना ३ ते १० वर्ष शिक्षा, पाच लाख रूपये दंडाची शिक्षा कायद्यात करण्यात आली आहे.   

प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, कोणत्याही हिंदू मुलीला परधर्माच्या मुलाने फसवून किंवा अमिष दाखवून विवाह करण्यास प्रतिबंध करणारा आणि तसे केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मूभा देणाऱ्या तरतूदी या विधेयकात असतील. 

भाजपने केरळमध्ये आपल्या जाहीरनाम्यात लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. लव्ह जिहादचा मुद्दा केरळ विधानसभेच्या निवडणूकीत खूप चर्चेत आहे. यात हिंदू समाजाला ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. 

या कायद्यामुळे धर्म परिवर्तन करुन विवाह करणे, विवाहानंतर धर्म बदलणे हा अपराध मानला जाणार आहे. याप्रकरणी संबधित परिवार, त्यांचे नातेवाईकांना पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे.   
Edited  by:Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख