विधानसभेत तांडव! आमदारांना लाथाबुक्क्या...फरफटत काढलं बाहेर

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
Bihar RJD MLAs Were Thrashed At Assembly
Bihar RJD MLAs Were Thrashed At Assembly

पाटणा : विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून काल बिहार विधानसभेत जोरदार राडा झाला. या विधेयकाला विरोध करणारे आमदार व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धक्काबुक्की झाली. सुरक्षारक्षकांनी विरोधी आमदारांना अक्षरश: फरफटत विधानभवनाबाहेर काढले. महिला आमदारांनाही ओढत आणल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून बिहारमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

बिहार विधानसभेत काल विशेष सशस्त्र पोलीस विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले. या विधेयकाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. हे विधेयक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विधेयक मंजुरीआधी विरोधी आमदार थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहचले. त्यांच्या हातातून विधेयक ओढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.  तेजस्वी यादव यांनी हे विधेयक फाडल्याने सत्ताधारी आमदारांनीही विरोध करण्यास सुरूवात केली.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. विरोधी आमदारांनी अध्यक्षांना घेराव घातल्याने पोलिसांनी आमदारांना धक्के मारून बाजूला केले. काही आमदारांना तर मारहाण झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आमदारांना फरफटत बाहेर काढण्यात आले. महिलांच्या केसांना धरून त्यांना ओढले जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या झटापटीत काही आमदार जखमीही झाल्याचे समजते. 

दरम्यान, या गदारोळानंतर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी लोकशाहीच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. तर विरोधी आमदारांनी नीतिश कुमार यांच्या आदेशावरूनच आमदारांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून आरजेडीचे आमदार आक्रमक झाले आहेत. 

काय आहे विधेयक?

बिहारमध्ये अजूनही बिहार मिलिटरी पोलीस नावाचे दल आहे. मिलिटरी हा शब्द कोणत्याही राज्याच्या पोलीस दलाला नसते. मिलिटरी हा शब्द हटविणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. विशेष सशस्त्र पोलिसांचे काम सरकारी संस्थांमधील सुरक्षा करणे हे असल्याचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी सांगितले. पण या दलाकडे कोणचीही तपासणी करण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार नाही. या विधेयकामुळे हे अधिकार मिळणार आहेत. तर या अधिकारांमुळे पोलिस कुणाचीही घरात थेट घुसून तपासणी करतील, अटक करतील असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com