#बिहार निवडणूक ; कोरोना रूग्णही बजावणार हक्क ; हजार मतदारांसाठी एक  केंद्र  - # Bihar elections; ; Corona patients also have the right to exercise  | Politics Marathi News - Sarkarnama

#बिहार निवडणूक ; कोरोना रूग्णही बजावणार हक्क ; हजार मतदारांसाठी एक  केंद्र 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कोरना रूग्ण आणि होम क्वारंटाइन रूग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

पटना : कोरोनाच्या संकटात बिहार विधानपरिषदेची देशातील पहिली निवडणूक होत आहे. याबाबत आज बिहारच्या निवडणुकीबाबत निवडणुक आय़ोगाने काही घोषणा केल्या.  निवडणुक आय़ुक्त सुनील अरोडा यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

सुनील अरोडा म्हणाले की कोरानाच्या संकटात देशातील पहिली निवडणुक ही बिहार विधानसभेची होत आहे. कोरोनाच्या संकटात निवडणुक घ्यायची की नाही याबाबत जगातील सर्व निवडणुक आय़ोगाना समोर हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण निवडणुक टाळता येऊ शकत नाही.  कोरोनाची संकटात मतदारांची सुरक्षेची काळजी घेत लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका घेणं गरजेचं आहे. यासाठी निवडणुक आयोगानं त्याची सुरवात राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून केली आहे. 

बिहार विधानसभेसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रात एक हजार मतदारांना मतदान करता येणार आहे. यापूर्वी एका मतदार केंद्रात पंधराशे मतदार मतदान करू शकते होते. यामुळं या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढणार  आहे.  यंदा सकाळी सात ते सांयकाळी सहावाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ऑनलाइन मतदान करण्यासाठी यंदा निवडणूक आय़ोगानं व्यवस्था केली आहे. कोरना रूग्ण आणि होम क्वारंटाइन रूग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणुक आयोगानं यासाठी तयारी सुरू केली आहे. ४६ लाख मास्क, ६ लाख पीपीई किट, ७.२ कोटी सिंगल युज हॅण्डग्लोज, ७ लाख सॅनिटाइजर, २३ लाख ग्लोज आदींची व्यवस्था निवडणूक आयोगनं केली आहे. टपाल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रूग्ण आणि कोरोना संशयीत रूग्णांसाठी सांयकाळी शेवटच्या तासात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. 

कोरोनाचे नियम पाळूनच निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यात जेडीयूचे सरकार असून नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे सुशील मोदी आहेत. हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जेडीयू आणि राजदची सत्ता होती. पुढे नितीशकुमार यांनी राजदची फारकत घेऊन भाजपशी हात मिळविणी केली होती. 

सध्याचे पक्षिय बलाबल 
एकून जागा 243 
आरजेडी 86 
जेडीयू 71 
भाजप 53 
लोजप 02 
इतर 04 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख