#Bihar Election ; सर्व 243 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी...  - Bihar Election Congress ready to contest all 243 seats | Politics Marathi News - Sarkarnama

#Bihar Election ; सर्व 243 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

काँग्रेसने बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व 243 जागा लढविण्याचे ठरविले आहे.

पटना  : निवडणुक आयोगानं बिहार निवडणुकीचं रणशिंग नुकतेच फुंकले आहे. सध्या बिहारमधील राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व 243 जागा लढविण्याचे ठरविले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला आघाडीत जर सन्मानजनक जागा मिळणार असतील , तर ते त्यांच्यासोबत निवडणुक लढविणार असल्याची माहिती काँग्रेस कार्यकारणीनी समितीचे प्रमुख अविनाश पांडेय यांनी दिली आहे. 

पांडेय म्हणाले की राष्ट्रीय जनता दलासोबत आमची सन्मानपुरक युती झाली तर आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढविणार आहोत. बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते अविनाथ पांडेय, सदस्य काजी निजामुद्दीन आणि देवेंद्र यादव हे पटना येथे पोहचले आहे. दोन दिवसाच्या बिहार यात्रेपूर्वी समिती सदस्यांची बैठक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष समीर कुमार सिंह श्याम सुंदर धीरज, आमदार डॅा. अशोक कुमार कैाकब कादरी, कॅाग्रेसचे विधानसभेचे नेते सदानंद सिंह, निवडणुक अभियान समितीचे अध्यक्ष राज्यसभा खासदार डॅा. अखिलेश प्रसाद सिंह यांच्यासोबत झाली आहे.
 
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला नेत्रदिपक विजय मिळेल, असा विश्वास या राज्यातील भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल बिहारमधील मतदानाच्या तारखा घोषित झाल्यावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस बोलत होते. बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे. कल्याणकारी योजनांमुळे मोदी आपल्या प्रदेशाचा विकास करतील, याची खात्री असल्याने एनडीएला भरभरून मते मिळतील, असा विश्वास आहे. बिहार निवडणुकांचे प्रभारी नेमल्यानंतर फडणवीस यांनी बिहार राज्याचा दौरा केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.  बिहारमधील राजकारण आता तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिकयुद्ध सुरू झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकीची तारीख जाहीर होताच टि्वट करत प्रसाराचं रणशिंग फुंकले आहे.  बिहारमधील मतदारांना जनतेचं राज्य आणण्यासाठी आव्हान केलं आहे. याबाबत लालू प्रसाद  यादव यांनी टि्वट केलं आहे.  
 
बिहारमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रात एक हजार मतदारांना मतदान करता येणार आहे. यापूर्वी एका मतदार केंद्रात पंधराशे मतदार मतदान करू शकते होते. यामुळं या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढणार  आहे.  यंदा सकाळी सात ते सांयकाळी सहावाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ऑनलाइन मतदान करण्यासाठी यंदा निवडणूक आय़ोगानं व्यवस्था केली आहे. कोरना रूग्ण आणि होम क्वारंटाइन रूग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणुक आयोगानं यासाठी तयारी सुरू केली आहे. ४६ लाख मास्क, ६ लाख पीपीई किट, ७.२ कोटी सिंगल युज हॅण्डग्लोज, ७ लाख सॅनिटाइजर, २३ लाख ग्लोज आदींची व्यवस्था निवडणूक आयोगनं केली आहे. टपाल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रूग्ण आणि कोरोना संशयीत रूग्णांसाठी सांयकाळी शेवटच्या तासात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. 

कोरोनाचे नियम पाळूनच निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यात जेडीयूचे सरकार असून नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे सुशील मोदी आहेत. हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जेडीयू आणि राजदची सत्ता होती. पुढे नितीशकुमार यांनी राजदची फारकत घेऊन भाजपशी हात मिळविणी केली होती. 

सध्याचे पक्षिय बलाबल 
एकून जागा 243 
आरजेडी 86 
जेडीयू 71 
भाजप 53 
लोजप 02 
इतर 04 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख