#बिहार निवडणूक : तेजस्वी यादवांकडून चिराग पासवान यांचे समर्थन..मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ - Bihar election Chirag Paswan support from Tejaswi Yadav Increase in CM's difficulty | Politics Marathi News - Sarkarnama

#बिहार निवडणूक : तेजस्वी यादवांकडून चिराग पासवान यांचे समर्थन..मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीकडून  तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याकडून टीकेचा भडीमार होत आहे. ​

पाटणा : बिहार निवडणुकीचा प्रचार हळूहळू जोर धरु लागला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर  आज टीका केली आहे. तेजस्वी यादव यांची ही राजकीय खेळी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.  

‘‘नितिश कुमार यांनी चिराग पासवान यांच्याबरोबर जे केले ते चांगले नाही. चिराग यांना त्यांच्या वडिलांची कधी नव्हे ते आत्ता गरज आहे. पण रामविलास पासवान आता आपल्यात नाहीत आणि याचे आम्हाला दुःख आहे. नितीश कुमार यांची वर्तणूक चिराग यांच्यावर अन्यायकारक होती,’’ असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीकडून  तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याकडून टीकेचा भडीमार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.तेजस्वी यादव यांनी सोमवारी चिराग यांची बाजू घेतली. 

वडिलांचे पार्थिव घेऊन पाटण्याला पोचलो असताना नितीश कुमार यांनी दुर्लक्ष करुन आपला अपमान केल्याचे चिराग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. हा संदर्भ घेत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला आहे.  
 
‘‘नितिश कुमार यांनी चिराग पासवान यांच्याबरोबर जे केले ते चांगले नाही. चिराग यांना त्यांच्या वडिलांची कधी नव्हे ते आत्ता गरज आहे. पण रामविलास पासवान आता आपल्यात नाहीत आणि याचे आम्हाला दुःख आहे. नितीश कुमार यांची वर्तणूक चिराग यांच्यावर अन्यायकारक होती,’’ असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले. 

तेजस्वी यादव यांची ही राजकीय खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिराग पासवान यांना ते समर्थन देत आहेत. या दोघांचा राजकीय शत्रू एकच असल्याने राघोपूर मतदारसंघाबाबत त्यांनी तडजोड केली असल्याची चर्चा आहे. येथे ‘आरजेडी’कडून तेजस्वी यादव निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात चिराग यांनी राजपूत उमेदवार उभा केला आहे. यामुळे भाजपला मिळणारी राजपूत समाजाची मते विभागली जातील आणि त्याचा फायदा तेजस्वी यांनी होईल, असे गणित यामागे मांडले आहे. दोन्ही युवा नेत्यांचे वडील हे पूर्वी एकमेकांचे सहकारी होते. समाजवादी चळवळ ते नितीश कुमार यांच्यासह सहभागी झाले असल्याचा इतिहास आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख