बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह - Bihar Deputy CM's corona test positive | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

 पाटण्याच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी हे कोरोना  पॉझिटीव्ह  आले आहेत.

पाटण्याच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसापासून हलका ताप जाणत होता. कोरोना टेस्ट केली असता  पॉझिटीव्ह  अहवाल आला आहे. हि माहिती खुद्द उपमुख्यमंत्र्यांऩी सोशल माध्यमांतून दिली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला काेरोनाची हलकी लक्षणं दिसून येत होती, असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आहे. डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती ट्रीटमेंट चालू आहे. फुफ्फुसांचा सिटी स्कॅन केला असून तो सामान्य असल्याचे आढळून आले आहे. सर्व उपचार घेऊन पुन्हा बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत पुन्हा सक्रिय होईन अशी माहिती दिली आहे. 

सुशीलकुमार मोदी यांच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे बिहारमधील दोन मोठे नेते राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाझ हुसेन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 'मी काही अशा लोकांच्या संपर्कात आलो होतो, जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आज मी स्वत:ची चाचणी केली,  ती पॉझिटीव्ह आली, अशी माहिती ट्विटवरून दिली आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स