मध्य प्रदेशात काँग्रेसला झटका; राजीनामा देऊन आमदाराचा भाजप प्रवेश  - Big jolt to Kamalnath as Congress MLA Gives Resignation and Joins BJP | Politics Marathi News - Sarkarnama

मध्य प्रदेशात काँग्रेसला झटका; राजीनामा देऊन आमदाराचा भाजप प्रवेश 

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीर काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. दमोहचे काँग्रेस आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशात २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीर काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. दमोहचे काँग्रेस आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 

जुलै महिन्यात राहुल लोधी यांचे चुलत भाऊ प्रद्युम्न सिंह लोधी यांनी मलाहरा विधानसभा मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मलहरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पक्ष सोडला त्यावेळी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे राहुल लोधी यांनी सांगितले होते. परंतु, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आज सकाळी लोधी यांनी आपला राजीनामा मध्य प्रदेश विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान  व भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी पोटनिवडणुकीत भाजप सर्व जागी निवडून यावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे लोधी यांनी सांगितले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख