हरियाणामध्ये भाजप सरकारसमोर मोठं आव्हान... चैाटाला देणार राजीनामा.. - Big challenge for bjp in Haryana Dushyant chautala will resign khattar government crisis | Politics Marathi News - Sarkarnama

हरियाणामध्ये भाजप सरकारसमोर मोठं आव्हान... चैाटाला देणार राजीनामा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांना एमएसपी दिली नाही तर राजीनामा देणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री दुष्यंत चैाटाला यांनी सरकारला दिला आहे. 

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून पंजाबमध्ये अकालीदलानं भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर हरियानामध्ये आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका हरियानात मनोहरलाल खट्टर सरकारला बसणार असल्याचे बोलले जात आहे. जननायक जनता पार्टी (जेजीपी) खट्टर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना एमएसपी दिली नाही तर राजीनामा देणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री दुष्यंत चैाटाला यांनी सरकारला दिला आहे. 

एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार जननायक जनता पार्टी (जेजीपी)ची बैठक नुकतीत झाली. या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. शेतकरी आंदोलन आणि मतदारसंघात नागरिकांचे मत याबाबत जेजीपीच्या आमदारांनी या बैठकीत चर्चा केली. उपमुख्यमंत्री दुष्यंत चैाटाला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या मागणीने जोर धरला होता. 

हरियाणामध्ये 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत जेजीपीचे दहा आमदार निवडून आले आहेत. तर विधानसभेच्या एकूण 90 जागा असलेल्या भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही. भाजपला जेजीपीनं पाठिंबा दिला. त्यानंतर मनोहरलाल खट्टर हे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकरी आंदोलनामुळे जेजीपीनं पाठिंबा काढला तर खट्टर सरकार संकटात येऊ शकते.     
 
हेही वाचा : जयराम रमेश यांचा मोदी सरकारला टोमणा... 
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्येच 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केलं. या नव्या संसद भवनाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. नव्या संसद भवनाच्या भूमीपूजनानंतर नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भय संसद भवन असा उल्लेख केला आहे, यावरून जयराम रमेश यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे. जयराम रमेश यांनी जुने आणि नवे संसद भवनातील साम्य दाखविण्यासाठी दोन्ही भवनाचे इमारतींचे फोटो आपल्या टि्वट अंकाऊटवरून शेअर केले आहेत. सध्याच्या संसद भवन आणि चौसठ योगिनी मंदिराचेही फोटोही जयराम रमेश यांनी शेअर केले आहेत.आपल्या टि्वटमध्ये जयराम रमेश म्हणतात, ''इंग्रजांनी बनवलेल्या सध्याच्या संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन आत्मनिर्भर संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख