भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या..

डी.के. गुप्ता असे या भाजप नेत्याचे नाव आहे. भाजपच्या फिरोदाबाद विभागाचे गुप्ता हे उपाध्यक्ष होते.
2golibar_12feb_0.jpg
2golibar_12feb_0.jpg

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काल (शुक्रवारी) मध्यरात्री हा प्रकार घडला. डी.के. गुप्ता असे या भाजप नेत्याचे नाव आहे. भाजपच्या फिरोदाबाद विभागाचे गुप्ता हे उपाध्यक्ष होते. 

डी.के. गुप्ता हे रात्री आपले दुकान बंद करून निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. यात ते गुप्ता हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी त्यांना आग्रा येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे फिरोजाबाद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त एनडीटिव्हीनं दिलं आहे.  

पूर्ववैमन्यातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डी.के, गुप्ता आणि मारेकरी याच्यात वाद होते. यातून ही हत्या झाली असावी, असा आरोप गुप्ता यांच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी काही संशयीतांची नावे सांगितली आहेत. हल्लेखोऱ्याना शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल, असे पटेल यांनी सांगितले. 
  

भाजप नेत्याने अधिकाऱ्यांसमोरच झाडल्या तरुणावर गोळ्या 

लखनौ : भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांसमोरच एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्य आरोपी धीरेंद्रसिंह हा भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांचा निकटवर्तीय आहे. शिवाय धीरेंद्रसिंह हा स्वतः भाजपचाच या भागातील बाहुबली नेता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेनंतर धीरेंद्र फरारी झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके विविध ठिकाणांवर रवाना झाली आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

बलिया जिल्ह्यातील दुर्जनपूर आणि हनुमानगंजमधील सरकारी कोट्यातील दोन दुकानांचा लिलाव करण्यासाठी पंचायत भवनात बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी स्थानिक प्रशासनातील अनेक बडे अधिकारीही उपस्थित होते. या दुकानांसाठी 4 स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज केले होते. 

दुर्जनपूर येथील दुकानांसाठी दोन गटांमध्ये मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले, या वेळी अधिकाऱ्यांनी आधार अथवा अन्य दुसरे ओळखपत्र असणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार असेल, असे सांगितले. येथे एका गटाकडे ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने हा चिघळला. यानंतर धीरेंद्रने जयप्रकाश ऊर्फ गामा पाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. या त्यांचा मृत्यू झाला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com