बंगाली अभिनेत्री भाजपमध्ये..निवडणूक लढविणार की स्टार प्रचारक होणार..

विधानसभेसाठी श्राबंती चटर्जीनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Srabanti Chatterjee2F.jpg
Srabanti Chatterjee2F.jpg

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अनेक चित्रपट कलाकार राजकारणात प्रवेश करीत आहेत. बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्राबंती चटर्जी हीने हाती कमळ धरत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत श्राबंती चटर्जीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येत्या विधानसभेसाठी श्राबंती ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आता भाजपप्रवेशानंतर तिला विधानसभेचं तिकीट मिळणार, की ती स्टार प्रचारक होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

श्राबंतीचा जन्म 13 आँगस्त 1987 रोजी झाला. श्राबंतीने बालकलाकार म्हणून 'मायार बाधोन' मधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. तिच्या नृत्य कैाशल्यांचे अनेक जण चाहते आहेत. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चैंपियन' (Champion) मध्ये तिची प्रमुख भूमिका होती. 'डान्स बांगला डान्स' या रिअॅलिटी शोचं तिनं परीक्षण केलं आहे. 

चॅम्पियन, भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात ती झळकली आहे. तिनं आतापर्यंत 15 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्राबंतीची एक वेब सीरिज 'दूजोने' लवकरच रिलीज होणार आहे. श्राबंतीने सोळाव्या वर्षी लग्न केलं होत. आतापर्यंत तिचे तीन लग्न झाले असून तिचं तिसरं लग्न देखील मोडलं आहे. तिला एक मुलगा आहे. 
 
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भाजप आमनेसामने

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे.ता. 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.  

तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

 

Edited  by :  Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com