परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन जीवघेणा हल्ला.. 'तृणमूल'चा हात असल्याचा आरोप - bengal violence trinamool goons attack minister muralidharans convoy | Politics Marathi News - Sarkarnama

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन जीवघेणा हल्ला.. 'तृणमूल'चा हात असल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.

कोलकाता :  निवडणुका संपल्यानंतरही  पश्चिम बंगालमध्ये Bengal Violenceहिंसाचार सुरुच आहे. पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यातील पंचखुडी येथील स्थानिकांनी आज परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला केला.  मुरलीधरन यांनी ही माहिती टि्वट करुन ही माहिती दिली आहे.  या हल्ल्यासाठी त्यांनी तृणमूल trinamool कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. मुरलीधरन सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. bengal violence trinamool goons attack minister muralidharans convoy

निवडणुकीच्या निकालानंतर गृह मंत्रालयाने नियुक्त केलेले 4 सदस्यीय पथक, अतिरिक्त सचिव-स्तरीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, हिंसाचारानंतरच्या वास्तव परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आज कोलकाता येथे दाखल झाले आहे.  बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्यात भाजपच्या १४ कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचा दावा पक्षाने केला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुरलीधरन हे येथे आले होते. त्यांच्याबरोबर असलेले भाजपचे नेते राहुल सिन्हा यांच्यावरही हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. 

मोदी, शाह यांचे नाव 'केडीएसए' ने धुळीला मिळवलं...भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

"ही बंगालची संस्कृती नाही. महिलांवर हल्ले होत आहेत. ही गुंडगिरी आहे. माझ्या वाहनावरही आज हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मी केंद्राला अहवाल देणार आहे," असे मुरलीधरन यांनी सांगितले. 

मुरलीधरन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला.  व्ही. मुरलीधरन आज पश्चिम मिदनापूर येथील भाजप कार्यकर्त्याला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. तेवढ्यात त्यांच्या ताफ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. यादरम्यान त्यांच्या वाहनाच्या काचाही फुटल्याचे व्हिडिओ स्पष्ट दिसते. पश्‍चिम मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ताफ्यावर हल्ला केला, काचा फोडल्या, माझ्या खासगी कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. त्यामुळे ही माझा हा दौरा रद्द केला, असे त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित मैती म्हणाले, ‘‘भाजपविरोधात जनतेने व्यक्त केलेला उत्स्फूर्त निषेध होता. या घटनेत आमच्या एकाही कार्यकर्त्याचा हात नाही. पश्‍चिम मिदनापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. ते लोकांना चिथावणी देत असून हे भाजपचे नाटक आहे.’’राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंबंधीचा अहवाल पाठविण्‍याची सूचना गृह मंत्रालयाने राज्यपाल जगदीश धनकर यांना केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी हल्ल्याची धमकी दिलीच होती...?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुरलीधरन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. जावडेकर म्हणाले की, लाखो लोकांना घर सोडावे लागले, कारण त्यांच्या घरावर हल्ला झाला. घरे जाळण्यात आली. ही लोकशाही नाही. परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांच्यावर आज ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, त्यावरून बंगाल सरकारने लोकशाहीला लाज आणली आहे. मंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय होईल.  ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात यापूर्वी अशा हल्ल्याची धमकी दिलीच होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख